जळगाव ः प्रतिनिधी
सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समिती ही जळगाव शहरात विविध उपक्रमांद्वारे थोर महापुरुषांच्या विचारांचा जागर करत असते. या समिती तर्फे छत्रपती संभाजी राजे यांच्या जयंती निमित्त पुजन करण्यात आले.
छत्रपती संभाजी राजे हे वीर योद्धे होते, त्यांनी त्यांच्या ३२ वर्षाच्या आयुष्यात २१० लढाया लढल्या व त्यातील एकही लढाई ते हरले नाहीत, तसेच राजे लेखक होते, बुधभूषण या ग्रंथाचे लेखन केले होते. असा अंजिक्य व योद्धा राजा मराठा साम्राज्याचा छत्रपती होता. हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतिक असलेल्या राजांची जयंती जळगाव शहरातील हिंदू व मुस्लिम बांधवांनी साजरी केली. राजांची वंदन व अभिवादन सभा जळगाव शहरातील सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती तर्फे करण्यात आली होती.
या प्रसंगी पुरुषोत्तम आबा चौधरी, मुक्तार शहा, अफान शहा, संजय चव्हाण, सुजीत शिंदे, खुशाल आप्पा चव्हाण, आर. डी. पाटील, जितू पाटील, सुनील लाड, धर्मेंद्र पाटील आदी उपस्थित होते. या प्रसंगी सोशल डिस्टंसिगचा वापर करून जयंती साजरी करण्यात आली.