यावल, प्रतिनिधी । एक घटस्फोटित तरुण महिला हरवल्याची नोंद पोलीस स्टेशनला गेल्या चार महिन्यापूर्वी झालेली होती आणि आहे.या प्रकरणात खबर देणार तरुण महिलेच्या वडिलाना पोलिसांनी मदत न करता पळवून नेलेल्या मुलास मदत करून त्या मुलीस एका पोलिसाच्या घरी नेऊन मुलीच्या आई-वडिलांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली जात असल्याची लेखी तक्रार महिलेच्या वडिलांनी पोलीस अधीक्षक जळगाव यांच्याकडे केल्याने यावल तालुक्यात लव जिहाद प्रकरणाकडे जिल्ह्यातील काही महिला संघटनांचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप यावल तालुक्यातून केला जात आहे.
सोमवार दि.17 जानेवारी 2022 रोजी पोलीस अधीक्षक जळगाव जिल्हा यांच्याकडे दिलेल्या लेखी तक्रारीत यावल तालुक्यातील एका घटस्फोटीत तरुण मुलीच्या वडिलांनी म्हटले आहे की, गावातील एका दुसऱ्या समाजातील मुलाने माझी मुलगी दि.7/9/ 2021पासून पळवून नेली आहे,त्या मुलीने मध्यंतरीच्या काळात आम्हाला फोन करून कळविले होते की ती परत येण्यास उत्सुक आहे परंतु तिला तो मुलगा व त्याच्या परिवाराकडून जीवे ठार मारण्याच्या धमक्या दिल्या जात होत्या तसेच तुझ्या परिवारातील इतर लोकांनाही ठार मारू असे सांगितले जात होते गेल्या आठवड्यात माझी मुलगी त्या मुलासोबत यावल पोलीस स्टेशनला हजर झाली होती. परंतु तेथील तपास करणाऱ्या पोलिसांने आम्हाला कुठलीही मदत केली नाही उलट तुमची मुलगी आता तुमची नाही,तुम्ही तिचा नाद सोडून द्या ती सज्ञान झाली आहे असे सांगितले व तेथेही त्यावेळेस मुलीवर “तो” पोलिस व तो मुलगा दबाव ठेवून होता, अजूनही माझ्या मुलीचे व त्या मुलाशी लग्न झालेले नाही व त्या मुलाचा परिवार आता गावात अशी चर्चा करीत आहे की समस्त समाजाच्या लोकांच्या नाकावर टिच्चून आम्ही मुलीचे व मुलाचे लग्न गावात लावू या लोकांकडून आमचे मानसिक सामाजिक खच्चीकरण केले जात आहे व सतत बदनामी केली जात आहे या दिवशी ती यावल पोलीस स्टेशनला आली होती त्या दिवशी तिने फक्त दबावापोटी माझ्या सोबत येण्यास नकार दिला होता.
परंतु त्यानंतर माझी मुलगी व तो मुलगा भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशन मधील एका पोलीस कर्मचाऱ्याच्या घरी त्या मुलासोबत दोन दिवस होती, तरी पोलिसांनी मला मदत करून मुलीला समजवण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे होते किंवा महिला संघटनांकडे,महिला आयोगाकडे, महिला संबंधित विभागाकडे त्या मुलीला रवाना करायला पाहिजे होते, पण त्यांनी तसे न करता तिच्यावर दबाव टाकला आहे या प्रकरणामुळे आमच्या गावात सुद्धा दोन समाजात तेढ निर्माण होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे तरी आपण संबंधित पोलिसांची चौकशी करून कारवाई करावी व माझी मुलगी मला परत मिळणे संदर्भात कार्यवाही करावी अशी विनंती मुलीच्या वडिलांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे केली आहे. या घटनेमुळे यावल तालुक्यात लव जिहाद प्रकरणाला पोषक वातावरण निर्माण झाले आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.