स्व.रतनालाल सी बाफना यांच्या स्मरणार्थ कोविड रुग्णांसाठी ऑक्सीजन कॉन्सन्ट्रेटर भेट

0
47

जळगाव ः प्रतिनिधी
भाईसा स्व.रतनलाल सी बाफना यांच्या स्मरणार्थ डॉ.उल्हास पाटील कोविड रुग्णालयाला ३ ऑक्सीजन कॉन्सन्ट्रेटर भेट देण्यात आले. सहज हाताळता येणारे आणि कुठेही घेवून जाता येणारी ही मशिन रुग्णांसाठी निश्‍चितच उपयुक्त ठरेल.
डॉ.उल्हास पाटील कोविड रुग्णालयात डॉक्टर्स डे निमित्त ऑक्सीजन कॉन्सन्ट्रेटर या उपकरणाचे अनावरण करण्यात आले. याप्रसंगी गोदावरी फाऊंडेशनचे सदस्य डॉ.वैभव पाटील, डॉ.उल्हास पाटील मेडिकल कॉलेजचे प्रशासकीय अधिकारी प्रमोद भिरुड, सुशिल कस्तुरीचंद बाफना, ड्युटी डॉक्टर परिमल हे उपस्थित होते.
याप्रसंगी सुशिल कस्तुरीचंद बाफना म्हणाले की, भाईसा स्व.रतनलाल सी बाफना यांच्या शिकवणीतून आपण समाजाचे एक घटक आहे, त्या भावनेने आपण समाजाचे देणे लागतो तसे संस्कारही आमच्यावर केले आणि आज त्याच प्रेरणेतून त्यांच्या स्मरणार्थ डॉ.उल्हास पाटील कोविड रुग्णालयाला अत्यंत आवश्यक असलेले ऑक्सीजन कॉन्सन्ट्रेटर सुपूर्द केले आहे.असेच ६ ऑक्सीजन कॉन्सन्ट्रेटर हे जळगाव येथील जिल्हा रुग्णालयाला देखील देण्यात आले आहे.
तसेच डॉ.उल्हास पाटील कोविड रुग्णालयातील डॉ.वैभव पाटील यांच्यासह सर्वच डॉक्टर हे रुग्णांची प्रेमाने काळजी घेत असून आपली सेवा प्रामाणिकपणे बजावत असल्याचे गौरवोद्गार बाफना यांनी यावेळी काढले. ऑक्सीजन कॉन्सनट्रेटर स्विकारतांना डॉ.वैभव पाटील यांनी आभार मानत या उपकरणामुळे कोविड रुग्णांना एका ठिकाणाहून टेस्ट करण्यासाठी दुसर्‍याठिकाणी नेतांना हाताळणे सोपे असल्याने तसेच ऑक्सीजन पुरवठा सुरळीत सुरु राहिल्याने रुग्णांची प्रकृती स्थिर राहील असे डॉ. पाटील यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here