Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»स्व. अटल बिहारी वाजपेयी उपवन उद्यानाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण
    जळगाव

    स्व. अटल बिहारी वाजपेयी उपवन उद्यानाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

    saimat teamBy saimat teamSeptember 18, 2021No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    स्व. अटल बिहारी वाजपेयी उपवन उद्यानाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव, प्रतिनिधी । जळगाव शहर महानगरपालिका, जळगाव व केंद्र शासनाच्या अमृत हरीत क्षेत्र विकास कार्यक्रमांतर्गत शहरातील रायसोनीनगरात उभारण्यात आलेल्या स्व.अटलजी बिहारी वाजपेयी उपवन उद्यान लोकार्पण सोहळा शुक्रवार,दि. 17 सप्टेंबर 2021 रोजी रात्री साडेआठच्या सुमारास पार पडला. पालकमंत्री तथा स्वच्छता व पाणीपुरवठामंत्री मा.ना.श्री.गुलाबराव पाटील यांच्या हस्ते हा लोकार्पण सोहळा पार पडला.

    साधारणपणे 1100 चौ.मी. जागेत उभारण्यात आलेल्या या उपवन उद्यानात चिमण्या, कबुतर, कावळे आदी पक्ष्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढावी, यासाठी वृक्षलागवड करण्यात आलेली असून, लॉन, जॉगिंग ट्रॅकचीही या ठिकाणी सुविधा आहे. त्यामुळे हा उद्यान परिसर अतिशय निसर्गरम्य बनला असून, ऑक्सिजननिर्मितीसाठी पोषक ठरणार आहे. प्रभाग क्र. 13 च्या नगरसेविका सौ.ज्योती चव्हाण व प्रभाग अधिकारी श्री.बाळासाहेब चव्हाण यांनी हे उद्यान अधिकाधिक चांगल्या पद्धतीने व्हावे, यासाठी सातत्याने पाठपुरावा केला व परिश्रम घेतले.

    माजी मंत्री तथा आमदार श्री.गिरीश महाजन या कार्यक्रमाच्या अध्यस्थानी होते. जळगाव लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्री.उन्मेष पाटील व महापौर सौ.जयश्री सुनिल महाजन यांची विशेष उपस्थिती होती. तर महापालिका आयुक्त श्री.सतीश कुलकर्णी, आमदार श्री.सुरेश ऊर्फ राजूमामा भोळे, उपमहापौर श्री.कुलभूषण पाटील, माजी महापौर श्री.सदाशिवराव ढेकळे, श्री.नितीन लढ्ढा, सौ.सीमा भोळे, महापालिका स्थायी समितीचे सभापती श्री.राजेंद्र घुगे-पाटील, महापालिकेतील विरोधी पक्षनेते श्री.सुनिल महाजन, नगरसेविका सौ.सुरेखा तायडे, सौ.अंजनाबाई सोनवणे, सौ.गायत्री राणे, अ‍ॅड. शुचिता हाडा, सौ.दीपमाला काळे, नगरसेवक श्री.जितेंद्र मराठे, श्री.नितीन बरडे, श्री.विक्रांत ऊर्फ गणेश सोनवणे, श्री.विरेंद्र खडके, महापालिका शहर अभियंता श्री.अरविंद भोसले, शाखा अभियंता श्री.चंद्रकांत सोनगिरे आदींसह रायसोनीनगरातील ज्येष्ठ नागरिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उद्यानाचे मक्तेदार श्री गजानन एन्टरप्राइजेस, जळगाव हे आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat team
    • Website
    • X (Twitter)

    Related Posts

    Shirsoli/Jalgaon : भरधाव पिकअपचा कहर शिरसोलीतील ३७ वर्षीय दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

    February 15, 2026

    Jalgaon : महापौर दिपमाला काळे यांची विक्रेत्यांसोबत १६ फेब्रुवारीला महत्त्वपूर्ण बैठक

    February 15, 2026

    Jalgaon : महाबळ कॉलनीत भाजीपाल्याच्या दुकानाला भीषण आग

    February 15, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.