इंडियन इलेक्ट्रॉनिक ब्रँड Ptron ने भारतीय बाजारात आपला नवीन स्मार्टवॉच Ptron FORCE X11 ला लाँच केले आहे. ही एक ब्लूटूथ कॉलिंग स्मार्टवॉच असून, याची किंमत २,८०० रुपयांपेक्षा कमी आहे. ही वॉच Boat, Fire-Boltt आणि CROSSBEATS च्या वॉचला टक्कर देईल. या वॉचमध्ये १.७ इंच डिस्प्ले, बिल्ट-इन माइक आणि ब्लूटूथ कॉलिंग सारखे फीचर्स मिळतील.
Ptron FORCE X11 ची किंमत
वॉटर रेसिस्टेंटसाठी आयपी६८ रेटिंगसह येणारी ही वॉच ओनिक्स ब्लॅक आणि स्वेड पिंक रंगात येते. वॉचला अॅमेझॉन इंडियावरून २,७९९ रुपयात खरेदी करू शकता. यावर एक वर्षाची वॉरंटी देखील मिळते.
स्मार्टवॉचचे फीचर्स
या वॉचमध्ये ब्लूटूथ वी५.१ चिपसेट आणि बिल्ट-इन मायक्रोफोनद्वारे वायरलेस कॉलिंगची सुविधा मिळते. म्हणजे तुम्ही स्मार्टफोनशिवाय मित्रांशी बोलू शकता. यात इनकमिंग कॉल्ससाठी हँड्स-फ्री स्मार्ट नॉटिफिकेशन्स, एसएमएस आणि सोशल मीडिया अलर्टची सुविधा मिळते.
Ptron FORCE X11 स्मार्टवॉच वर्गाकार शेप डायलसह येते. यात १.७ इंच एचडी कलर डिस्प्ले दिला आहे, जो क्रिस्प ग्राफिक्स आणि एम्प्लीफाइड ब्राइटनेस मिळते. स्मार्टवॉचद्वारे हार्ट रेट आणि ब्लड ऑक्सिजन ट्रॅकिंग करू शकता. तसेच, ७ अॅक्टिव्ह स्पोर्ट्स मोड देखील दिले आहेत.
वॉच ३ तासात फुल चार्ज होते व जवळपास ७ दिवसांची बॅटरी लाइफ मिळते. तुम्ही वॉचद्वारे स्लिपिंगसह वेगवेळ्या अॅक्टिव्हिटी ट्रॅक करू शकता. वॉचला DaFit अॅपद्वारे कनेक्ट करू शकता. हे अॅप अँड्राइड आणि आयओएस दोन्ही यूजर्ससाठी उपलब्ध आहे. यात कस्टमाइज्ड वॉच फेसेजचा देखील पर्याय मिळतो.