जामनेर, प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील पहूर येथील शिवसेनेचे प्रसिद्ध प्रमुख तथा पत्रकार गणेश राव पांढरे यांचे धाकटे बंधू स्वर्गीय श्याम कुमार पांढरे पैलवान यांचा आज 22 वा स्मृतिदिन निमित्त अभिवादन करण्यात आले.
येथील शिवसेना शहर कार्यालय स्वर्गीय शामकुमार पांढरे यांच्या प्रतिमेचे पूजन विविध कार्यकारी संस्थेचे माजी चेअरमन तथा माजी शहरप्रमुख सुकलाल बारी यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी पत्रकार गणेश पाढरे राष्ट्रीय काँग्रेसची तालुका उपाध्यक्ष रवींद्र पांढरे शिवसेना शहर प्रमुख संजय तायडे उपशहर प्रमुख सुभाष पाटील युवा सेनेचे उपतालुका प्रमुख अमीन शेख शिवसेना उपतालुका प्रमुख तथा ग्रामपंचायत सदस्यअशोक जाधव भाऊ राव गोंधनखेडे बापू सोनार गणेश तायडे आत्मा समितीचे सदस्य रमन क्षिरसागर गजानन पाटील शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.