जळगाव ः प्रतिनिधी
ब्राह्मण समाजातील युवकांना शैक्षणिक, व्यावसायिक तसेच रुग्णांना वैद्यकीय मदत मिळण्यासाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे. त्यासाठी महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात १ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्याच्या मागणीसाठी मंगळवारी ब्राह्मण समाजातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
बहुभाषिक ब्राह्मण संघ, बहुभाषिक ब्राह्मण महासंघ, ब्रह्मश्री बहुउद्देशिय संस्थेतर्फे हे धरणे आंदोलन करण्यात आले. या वेळी आंदोलकांनी जिल्हाधिकार्यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले. या वेळी पदाधिकारी आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.