सौ सु.ग.देवकर प्रायमरी स्कूल येथे राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण परीक्षा संपन्न

0
25

जळगाव, प्रतिनिधी । शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सौ सु.ग. देवकर प्रायमरी स्कूल मध्ये राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण NAS परीक्षा संपन्न झाली.

सदर परीक्षेला निरीक्षक म्हणून प्रीती सोज्वळ( केंद्रीय विद्यालय एन. एम. यू .जळगाव) तर सहाय्यक परीक्षक म्हणून वसीम शेख (समावेशित विशेष तज्ञ, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, जळगाव )वृषाली चौधरी ( विशेष शिक्षिका, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था जळगाव) हे उपस्थित होते. प्रथमतः विद्यार्थ्यांचे औक्षण करून स्वागत करण्यात आले. सदर परीक्षेला प्रभारी गटशिक्षणाधिकारी श्री विजय पवार साहेब यांनी भेट दिली. सूत्रसंचालन श्री किशोर सोनवणे व आभार श्री सागर पाटील यांनी मानले. सदर परीक्षा यशस्वी करण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. साधना महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक वृंद यांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here