विजय चौधरी-सोयगाव प्रतिनिधी
सोयगांव तालुक्यातील सोयगाव शहरात छत्रपती शिवाजी महाराज शिवजन्मोत्सव निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज यांची शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी सोयगाव शिवसेना तालुकाप्रमुख प्रभाकर (आबा) काळे, नगरअध्यक्ष आशाबी तडवी, उपनगर अध्यक्ष सुरेखाताई प्रभाकर काळे यांच्या हस्ते शिवराय मूर्ती पुजन करून आरती करण्यात आली. यावेळी जि.प.सदस्य गोपीचंद जाधव,नगरसेवक संतोष बोडखे, सध्यांताई मापारी, मनिषा संदीप चौधरी, गटनेते अक्षय काळे, नगरसेवक कुसुमताई राजु दुतोडें, भगवान जोहरे, गजानन कुडके, रमेश गव्हाडें, दिलीप देसाई, भगवान वारगणे, राजू माळी, योगेश पाटील, अमोल मापारी यांच्यासह मोठ्या संख्येने शिवभक्त उपस्थित होते. सोयगाव शहरात शिवजयंती शांततेत साजरी करण्यात आली. यावेळी ग्रामस्थ, शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती शांतेत व्हावी म्हणून सहा. पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली चौक बंदोबस्त ठेवण्यात आला होता.