सोयगाव नगराध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर पद अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी राखीव:आशाबी तडवी यांनी वर्णी लागणार

0
17
विजय चौधरी-सोयगाव प्रतिनिधी
सोयगाव येथील नगराध्यक्ष पदाचे आरक्षण गुरुवारी जाहीर करण्यात आले असून हे पद अनुसूचित जमाती महिला प्रवर्गासाठी राखीव झाले असून  शिवसेनेकडून वार्ड क्रमांक १७ मधील आशाबी अश्रफ तडवी नगराध्यक्षपदाच्या दावेदार झाल्या असून आता केवळ त्यांच्या नावाची घोषणाच बाकी असल्याचे चित्र आहे.
सोयगाव नगरपंचायतीच्या सभागृहात १७ सदस्य संख्या आहे त्यापैकी ११ जागांवर शिवसेनेचे उमेदवार विजयी झाले असून पक्षाला पूर्ण बहुमत मिळाले आहे तर दोन क्रमांकाचा पक्ष म्हणून भाजपने सहा जागांवर विजय मिळवला असल्याने अल्पमतात असलेल्या भाजपाकडे नगराध्यक्ष पदाची महिला वार्ड क्रमांक १३ मधून निवडून आलेली असतानाही बहुमत नसल्याने त्यांची संधी हुकली आहे त्यामुळे आता शिवसेना सत्तेसाठी दावा करणार आहे.
भाजपाकडे सहा जागा:
भाजपकडे सहा जागा असून शिवसेनेने अकरा जागांवर विजय मिळवला आहे भाजपच्या तीन जागा केवळ २९ मतांनी पराभूत झालेले आहे त्यामुळे भाजपला नगरपंचायत निवडणुकीत पहिला फटका पराभूत झाल्याचा तर दुसरा फटका अनुसूचित जमाती महिला उमेदवार निवडून आलेल्या असताना बहुमता अभावी सत्तेपासून दूर राहावे लागणार असल्याने शिवसेना बहुमताच्या जोरावर सत्ता स्थापनेचा दावा करून नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत ही डाव बाजी मारणार हे निश्चित आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here