सोयगाव, प्रतिनिधी । सतरा जागांसाठी झालेल्या दोन टप्प्यातील निवडणुकीच्या मतदानाची मोजणी बुधवारी सकाळी दहा वाजता सुरु हाती घेण्यात येणार आहे त्यासाठी तब्बल तीन टेबल साठी ३५ कर्मचारी तैनात करण्यात आली असून मतमोजणीची पूर्वतयारी अंतिम टप्प्यात असल्याची माहिती तहसीलदार रमेश जसवंत यांनी दिली आहे.५२ उमेदवारांचा बुधवारी फैसला होणार असून तीन टेबल साठी मतमोजणीची सहा फेऱ्यांमध्ये व्यवस्था करण्यात आलेली असून दुपारी बारा वाजेपुर्वी निकाल बाहेर येणे अपेक्षित आहे.