विजय चौधरी-सोयगाव प्रतिनिधी
वातावरणात बदल झाल्याने गायब झालेला थंडीचा जोर आठवडाभरापासून अचानक वाढल्याने सोयगावसह परिसर थंडीने गारठला आहे त्यामुळे नागरिकांनी उबदार कपडे जॅकेट, स्वेटर, मफलर, कानटोपी आदी उबदार कपडे वापरण्यास सुरुवात केली आहे तर या वाढलेल्या गारठ्यामुळे नागरीक शेकोटीची आसरा घेत आहेत
थंडी पासून बचाव करण्यासाठी नागरिक विविध मार्ग अवलंबत आहेत यंदा चांगला पाऊस पडल्याने रब्बी हंगामातील पिकांना याचा मोठा फायदा होणार आहे गहू ,हरभरा ज्वारी, मका पिकांची परिसरात मोठ्या प्रमाणात पेरणी करण्यात आली असून थंडीचे प्रमाण जास्त वाढल्याने शेतकरी चांगला सुखावला आहे
परिसरात वयोवृद्ध नागरिक शेकोट्या चा सहारा घेत आहेत काही दिवसात वातावरणात बदल झाल्याने समाधान व्यक्त होत आहे परंतु अधूनमधून ढगाळ वातावरण निर्माण झाले तर थंडी गायब होईल त्याचा परिणाम थेट रब्बी हंगामातील पिकांना फटका बसण्याची शक्यता शेतकऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत होती मात्र आठवडाभरापासून थंडीचा जोर वाढल्याने शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे
