पारोळा – श्री गुरूमाऊली सेवानंदजी गुरू सुपडूनंदजी धुनिवाले महाराज यांच्या ८व्या पुण्यतिथीनिमित्त सोमवार ता, 13 रोजी भव्य रक्तदान शिबीर सांगवी, दरबार येथे आयोजित करण्यात आले आहे.
दरवर्षी पुण्यतिथी निमित्त सांगवी दरबार येथे विविध समाजाभिमुख उपक्रम राबविले जातात.मात्र गेल्या दोन वर्षापासुन कोरोनाची परिस्थिती आहे. कोरोना काळात रक्ततुटवडा भासल्याने या वर्षी शासनाच्या नियमांचे पालन करुन सांगवी दरबारात रक्तदान शिबीर होणार असुन परिसरातील नागरिकांनी व तालुका पातळीवर रक्तदात्यांनी सहभागी होवुन या रक्तदान महायज्नात सहभागी होण्याचे आवाहन दादाजी धुनिवाले प्रतिष्ठान सांगवी कडून करण्यात आले आहे.
यावेळी रक्तदात्यांनी छोटू पाटील, सांगवी दरबार भ्रमणध्वनी 9960966100 यावर संपर्क करावा असे सुचित करण्यात आले आहे.