परिवहन मंत्री अनिल परब यांन केला आहे दावा
मंत्री हसन मुश्रीफ यांनी घेतली शरद पवारांची भेट
सोमय्या यांनी आयकर विभागाला दिले मुश्रीफांच्या घोटाळ्याचे पुरावे
प्रतिनिधी । मुंबई
भाजप नेते व माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यावर राज्याचे परिवहन मंत्री व शिवसेना नेते अॅड. अनिल परब यांनी मंगळवारी १०० कोटींच्या अबुनुकसानीचा दावा ठोकला आहे. परब यांचे वकील सुषमा सिंग यांनी सोमय्या यांना तशी नोटीस पाठवली असून ७२ तासात उत्तर देण्यास सांगतिले आहे.
सोमय्या यांनी परब यांच्यावर कोकणात दापोली येथे बेकायदा हाॅटेल बांधल्याचा आरोप केला होता. तसेच प्रादेशिक परिवहन विभागात (आरटीओ) बदल्याचे रॅकेट परब यांनी चालवल्याचा जाहीर आरोप केला होता. त्याबाबतचे पुरावे त्यांनी सक्तवसुली संचालनालय व आयकर विभागाला दिले होते. परब यांनी सोमय्या यांचे आरोप फेटाळून लावत अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे.
सोमय्या यांनी ग्रामविकास मंत्री व राष्ट्रवादीच्े नेते हसन मुश्रीफ यांच्यावर सोमवारी १२७ कोटींच्या घोटाळ्याचे आरोप केले होते. त्यानंतर आज मंत्री मुश्रीफ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मुंबईत भेट घेतली. सोमय्यांचे आरोप आणि सत्य परिस्थिती यासंदर्भातली माहिती पवारांनी घेतल्याचे समजते.
हसन मुश्रीफ यांच्या कुटुंबियांनी बेनामी संपत्ती गोळा केल्याबाबतचे 2700 पानांचे पुरावे सोमय्या यांनी आज मुंबईत आयकर विभागाला दिले. ठाकरे सरकारच्या डर्टी इलेव्हनची नावे मी जाहीर केली होती, यामध्ये राखीव खेळाडूंचाही समावेश झाला आहे, असे सोमय्या यानी पत्रकारांना सांगितले.
मुश्रीफ यांनी सोमय्या यांच्यावर १०० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. शिवसेना आमदार रविंद्र वायकर यांनी सोमय्या यांच्यावर १०० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा पूर्वी दाखल केला आहे.