सोन्याच्या दरात किलोमागे तब्बल चार हजार रुपयांनी घसरला

0
48
जाणून घ्या दर : सोन्याच्या दरात घसरण सुरूच, तर चांदीच्या भावात वाढ

मुंबई, वृत्तसंस्था । सोने खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात मोठी तेजी होती. तर आज देशभरात सोन्याचा दर किलोमागे तब्बल चार हजार रुपयांनी घसरला. आंतरराष्ट्रीय मौल्यवान धातूंच्या किमतीत घसरण झाल्याने ही स्थिती असल्याचे पाहायला मिळाले. भारतात १० ग्राम २२ कॅरेट सोन्याची किंमत ४५,५०० रुपये झाली आहे.

मागील ट्रेडमध्ये या या मौल्यवान धातूची किंमत ४५,९०० रुपये प्रति ग्रॅमवर बंद झाली. दिल्लीत सोन्याचा दर ४५,५०० रुपये होता. गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार चांदी ६३,२०० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात.

मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ४५,५०० रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर कमी झाला आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ४९,६४० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४५,५०० असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ४९,६५० रुपये असेल. नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४५,५०० तर २४ कॅरेट सोन्याचा दर ४९,४५० रुपये इतका असेल. चांदीचा आजचा प्रती १० ग्रॅमचा दर ६३२ रुपये आहे.

या किमती स्थानिक किमतींशी जुळत नाहीत कारण यामध्ये GST, TCS आणि इतर कर समाविष्ट नाहीत. देशभरातील विविध शहरांमध्ये 22 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमच्या या किमती आहेत. हे दर गुड रिटर्न्स या वेबसाइटवरून घेतले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here