सैनिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण केली पाहिजे-गणेश शिंदे

0
26

 

पाचोरा ः प्रतिनिधी

भडगाव तालुक्यातील  पिंपळगाव बु. येथील जितेंद्र देविदास पाटील हे भारतीय सैन्यदलात१०१ मराठा बटालियनमधून २१वर्षाच्या कार्य सेवेतून निवृत्त झाले.त्यांची स्वागत सत्कार रॅली काल रोजी सकाळी येथील रेल्वे स्टेशनपासून ते छत्रपती शिवाजी महाराज चौकपर्यंत काढण्यात आली. सैनिक जितेंद्र पाटील यांनी प्रथम भारतरत्न डॉ. बाबासाहेब आबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला माल्यार्पण केले व त्यानंतर त्यांच्या  सत्कार मिरवणुकिला सुरुवात झाली. ओपन जीप फुलांनी सजवून बॅण्ड पथकाच्या माध्यमातून देशभक्तीपर गीत गाऊन भव्य रॅली काढण्यात आली.

 

या रॅलीत सैनिकांचा परिवार, नातेवाईक,मित्र मंडळी व माजी सैनिक देखील सहभागी झाले होते.या वेळी जनता प्रबोधन बहुद्देशीय संस्था व छत्रपती शिवाजी महाराज रिक्षा स्टॉपतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला.

जनता प्रबोधन बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष गणेश शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले की , देशासाठी बाजी लावणार्‍या सैनिकाला जो मान-सन्मान द्यायला पाहिजे, तो आज समाजात दिला जात नाही. सैनिकांप्रती असलेल्या कर्तव्याची जाणीव, कोणी सांगून नव्हे, तर आपल्या मनातून यायला हवी. सीमेवर लढताना मागे आपल्या कुटुंबाची काळजी घ्यायला लाखे-करोडो बांधव आहेत, अशी सुरक्षिततेची भावना आपण जवानांमध्ये निर्माण करायला हवी,नव्हे ते आपलं कर्तव्यच आहे,असे सांगितले.

या वेळी उदयनराजे भोसले ग्रुपचे सचिन पाटील, रवि ठाकूर, अनिल भोई,अमृत पाटील,अशोक निंबाळकर,पप्पु जाधव, विकी पाटील, गोकुळ पाटील, विशाल परदेशी, गोरख महाजन,अशोक महाजन, सुशिल मराठे, प्रेम पाटील, नारायण वाणी, शुभम महाजन यांच्यासह सर्व व्यवसायिक पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here