Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»सुरक्षारक्षकासह दोघांवर गुन्हे दाखल करण्याचे अधिष्ठाता यांचे आदेश
    जळगाव

    सुरक्षारक्षकासह दोघांवर गुन्हे दाखल करण्याचे अधिष्ठाता यांचे आदेश

    saimat teamBy saimat teamFebruary 5, 2022No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव, प्रतिनिधी । शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील कोरोनाच्या आरटीपीसीआर अहवाल गैरव्यवहार प्रकरणी अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी गठीत केलेल्या समितीचा अहवाल सकाळी सादर झाला. या अहवालाच्या सूचनेप्रमाणे अधिष्ठाता डॉ. रामानंद यांनी संबंधित दोषींवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

    प्रसारमाध्यमांमध्ये जिल्हा सामान्य रूग्णालयात बोगस आरटीपीसीआर अहवाल मिळतात याबाबत माहिती प्रसिद्ध झाली होती. त्या अनुषंगाने अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी शल्यचिकित्सा विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ.प्रशांत देवरे यांच्या अध्यक्षतेखाली व उप वैद्यकीय अधीक्षक डॉ. योगिता बावस्कर, डॉ. संदीप पटेल यांच्या सदस्यत्वाखालील समिती नेमली होती.

    या समितीने तीन दिवस सखोल चौकशी करून निष्पक्ष अहवाल तयार केला. एकूण ३८ जणांचे जबाब नोंदवण्यात आले आहे. अहवाल शनिवारी ५ फेब्रुवारी रोजी अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांना सादर केला. त्यानुसार अहवाल वाचून अधिष्ठाता डॉ. रामानंद यांनी दोषी सुरक्षारक्षक राजेंद्र दुर्गे आणि डाटा एंट्री ऑपरेटर स्वप्नील पाटील यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय गायकवाड यांना दिले आहे.

    सुरक्षारक्षक दुर्गे व डाटा एंट्री ऑपरेटर स्वप्नील पाटील यांनी गैरव्यवहार केल्याचे लेखी मान्य केले असल्याची माहिती अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी दिली. तसेच या प्रकरणात शिक्का व सही बनावट आढळले आहे. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे, असेही डॉ. रामानंद यांनी सांगितले. दरम्यान, दुर्गे व स्वप्नील पाटील हे नातेवाईक आहे.

    दरम्यान, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनीदेखील बनावट आरटीपीसीआर अहवाल प्रकरणी समिती नेमलेली आहे. उपजिल्हा निवडणूक अधिकारी तुकाराम हुलवळे, जिल्हा शल्यचिकित्सक, वैद्यकीय अधीक्षक यांची समिती नेमली आहे. या समितीने देखील शनिवारी सकाळी अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांची भेट घेऊन संबंधित अधिष्ठाता यांनी नेमलेल्या समितीशी चर्चा केली.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat team
    • Website
    • X (Twitter)

    Related Posts

    Jalgaon : नेरी नाका परिसरातील रस्ता तात्पुरता बंद

    February 7, 2026

    Jalgaon : अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे १२ फेब्रुवारीला ठिय्या आंदोलन

    February 7, 2026

    Pachora-Jalgaon : पाचोरा–जळगाव महामार्गावर मध्यरात्री मृत्यूचा थरार

    February 7, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.