जळगाव ः प्रतिनिधी
शहरातील सुप्रीम कॉलनी परिसरात नागरिकांना पिण्याचे पाणी वाटप राष्ट्रवादीच्या वक्ता प्रशिक्षण विभागातर्फे काल वितरित करण्यात आले.यावेळी वक्ता प्रशिक्षण शहर जिल्हाध्यक्ष साहिल पटेल , महानगराध्यक्ष अभिषेक पाटील,जाकीर पिंजारी, अल्तमश खान ,मोसीन खाटीक, रशीद खान ,शकील पटेल आदी उपस्थित होते.
गेल्या १८ दिवसांपासून या परिसरात पिण्याचे पाणी येत नसल्याने नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असल्याने राष्ट्रवादीतर्फे काल टँकरद्वारे पाणी वितरण करण्यात आले.अनेक दिवसांपासून पाणी येत नसल्याने नागरिकांना पाण्याचे टँकर पाहून सुखद धक्का बसला.त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकार्यांचे आभार मानले . यावेळी साहिल पटेल यांनी नागरिकांना मनपातर्फे मूलभूत सुविधा मिळत नसल्याचे सांगत मनपाच्या कारभारावर टीका केली.