Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»सुनिल झंवरच्या भोवतीचा फास होणार घट्ट
    जळगाव

    सुनिल झंवरच्या भोवतीचा फास होणार घट्ट

    saimat teamBy saimat teamJanuary 29, 2021No Comments3 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव ः प्रतिनिधी
    बीएचआर घोटाळ्यातील झाडाझडतीच्या वेळेस सापडलेले जिल्हा परिषदमधील बनावट शिक्के हे शालेय पोषण या घोटाळ्याशी संबंधित असल्याचे समोर आले होते.या घोटाळ्याविरोधात सन २०१४ पासून लढा देणारे रविंद्र शिंदे हे लवकरच याबाबत पुणे आर्थिक गुन्हे शाखेकडे पुराव्यांसह तक्रार देणार असल्याचे वृत्त आहे.यानिमित्ताने ‘बीएचआर’नंतर आता शालेय पोषण घोटाळ्यातही सुनिल झंवरच्या भोवतीचा फास अधिक घट्ट होताना दिसत आहे.
    विशेष म्हणजे माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी सदरचा गुन्हा हा आर्थिक गुन्हा असल्याने व ठेकेदारासोबत झालेला करारनामा हा शिक्षण संचालक प्राथमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांच्यासोबत पुणे येथे झाला असल्याने याबाबतचा गुन्हा आर्थिक गुन्हे शाखा पुणे यांच्याकडे दाखल करण्याचे आदेश व्हावेत, अशी विनंती शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे एक महिन्यापूर्वी पत्र देऊन केली आहे.
    जिल्ह्यातील पोषण आहार घोटाळ्यात प्रत्येकवेळी नविन अपहार आणि गोंधळ समोर येत असतो.त्यानुसार आता जिल्ह्यातील पोषण आहार घोटाळ्याची व्याप्ती लाखोत नव्हे तर करोडो रुपयात असल्याची माहिती समोर येत आहे.सन २०१४ पासून लढा देणारे रविंद्र शिंदे यांनी याबाबत स्थानिक प्रशासनासह मंत्रालयापर्यंत तक्रारी केलेल्या आहेत. धान्यादी मालाच्या वजनात घट, पुरवठादाराकडून बाजारभावापेक्षा दुप्पट दराने मसाले पदार्थ वितरित करणे तसेच शाळांमध्ये धान्य न देताच त्यांची देयके अदा करण्यात आली होत़ी. यात तालुका स्तरावरील वाहतूकदार यांनी बनावट शिक्के तयार करून तालुकास्तरावरील गटशिक्षणाधिकारी,शालेय पोषण आहार अधीक्षक व ठेकेदार यांनी संगनमत करून बनावट शिक्के व स्वाक्षर्‍यांच्या आधारावर हा प्रकार केल्याचे समोर आले होत़े.
    एवढेच नव्हे तर पोषण आहार पुरवठ्याच्या करारातील नियम आणि अटीशर्तींचे पुरवठादाराकडून पालन होत नसल्याचे अनेकदा उघड झाले आहे.जि.प.चे तत्कालीन सिईओ कौस्तुभ दिवेगावकर यांनी तक्रारदार रविंद्र शिंदे यांच्याकडील कागदपत्रांची पाहणी केल्यानंतर तात्काळ आपल्या स्वाक्षरीने चौकशी समिती नेमली होती. या समितीला शालेय पोषण आहार योजनेत चौकशी केल्यानंतर पुरवठादार झंवरच्या कंपनीने १ लाख ३७ हजारांची खोटी बिले काढल्याची बाब पुढे आली होती. त्यानंतर दिवेगावकर यांची अवघ्या आठ दिवसात तडकाफडकी बदली झाली होती.
    भाईचंद हिराचंद रायसोनी (बीएचआर) मधील गैरव्यवहाराशी संबंधित गुन्ह्यातील संशयित आरोपी उद्योजक सुनिल झंवर यांच्या ऑफिसमधून शासनाच्या वेगवेगळ्या गॅझेटेड अधिकार्‍यांचे तब्बल शंभरहून अधिक बनावट शिक्के आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने जप्त केले होते. त्यानंतर या बोगस शिक्क्यांचे धागेदोरे थेट जिल्हा परिषदेपर्यंत येऊन पोहोचले होते. बीएचआर घोटाळा प्रकरणी टाकलेल्या छाप्यात सुनिल झंवरच्या कार्यालयात पिशवी भरून विविध शासकीय राजपत्रित अधिकार्‍यांचे शिक्के आढळून आल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली होती. कारण या शिक्यांच्या माध्यमातून शालेय पोषण आहार योजनेत जिल्हा परिषदेच्या यंत्रणेतील अधिकार्‍यांचे खोटे शिक्के आणि स्वाक्षरी करून बिले काढल्याची चर्चा जिल्हा परिषदच्या वर्तुळात सुरु होती.
    रविंद्र शिंदे यांच्या तक्रारीनंतर जिल्हा परिषदेचे तत्कालीन सिईओ कौस्तुभ दिवेगावकर यांना शालेय पोषण आहार योजनेत बोगस बिले काढली जात असल्याचा संशय आला होता. त्यांनी चार तालुक्यांची सॅम्पल चौकशी केल्यानंतर त्यात पुरवठादार असलेल्या झंवर यांच्या कंपनीने १ लाख ३७ हजारांची खोटी बिले काढल्याची बाब पुढे आली होती.
    माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे एक महिन्यापूर्वी तक्रार केली आहे. मला आशा आहे की, मंत्री गायकवाड मॅडम याबाबतचे आदेश काढतील आणि आर्थिक गुन्हे शाखा गुन्हा दाखल करेल. मंत्र्यांनी आदेश न दिल्यास लवकरच सर्व पुराव्यांसकट आर्थिक गुन्हे शाखेच्या उपायुक्त भाग्यश्री नवटके मॅडम यांची भेट घेवून रीतसर फिर्याद वजा तक्रार देणार असल्याचे वृत्त आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat team
    • Website
    • X (Twitter)

    Related Posts

    Jalgaon : नेरी नाका परिसरातील रस्ता तात्पुरता बंद

    February 7, 2026

    Jalgaon : अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे १२ फेब्रुवारीला ठिय्या आंदोलन

    February 7, 2026

    Pachora-Jalgaon : पाचोरा–जळगाव महामार्गावर मध्यरात्री मृत्यूचा थरार

    February 7, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.