जळगाव:– भारतीय कंपनी सचिव संस्थान यांनी नुकत्याच घेतलेल्या कंपनी सेक्रेटरी (सी. एस) परीक्षेत वीणा नारखेडे या उत्तीर्ण झाल्या. सीए पदम पाटील आणि सीए करण काबरा यांच्या मार्गर्शनाखाली वीणा यांनी कंपनी सेक्रेटरी हा कोर्स यशस्वी रित्या पूर्ण केला.
नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र सेट परीक्षेत देखील वीणा यांनी पहिल्याच प्रयत्नात यश मिळवले आहे. वीणा या साहित्यिक डॉ. अरविंद नारखेडे यांची नात तसेच सुहास आणि प्रिया नारखेडे यांची कन्या आहे.