जळगाव प्रतिनिधी:– येथील सिध्दी विनायक विद्यालयात हिंदवी स्वराज्य निर्मितीचे जनक व महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त “बालशिवाजी” चित्ररथाचे विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सादरीकरण केले. तसेच विद्यालयातील प्राजंली शिंपी या विद्यार्थ्यांनीने “अफजल खानाचा वध” या घटनेवर प्रेरणादायी पोवाडा सादर केला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला संस्थेच्या पदाधिकारी डॉ अमृता सोनवणे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी मुख्य मुख्याध्यापक श्री आर पी खोडपे श्री गुलाबराव पाटील उपस्थित होते. विद्यालयातील रुचिता पाटील, केवल पाटील, पारस कोळी, स्वाती सोनवणे, यांनी वक्तृत्व स्पर्धेत सहभागी झाले कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी श्री अनिल माकडे सत्यजीत वाघ, राहुल सोनवणे व शिक्षकवृंदानी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री अनिल पावरा यांनी केले.