जळगाव, प्रतिनिधी । सिंधी कॉलनीमधील लक्ष्मीनगर परिसरातील हनुमान मंदिरासमोर पैशांच्या वादातून तरूणावर चाकूने वार करण्यात आले. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
समतानगर भागातील आकाश भोला राठोड (वय 20) हा काही कामानिमित्त लक्ष्मीनगरात गेला होता. या वेळी संदीप कोळी याच्यासह इतर तीन जणांनी आकाश सोबत पैशांवरून वाद घातला. यात संदीप कोळी याने आकाशला दगड मारला. तर संदीपच्या भावाने धारदार शस्त्राने आकाशच्या मांडीवर वार करून दुखापत केली. इतर दोन जणांनाही आकाशला शिवीगाळ करत मारहाण करीत ठार मारण्याची धमकी दिली. यात आकाश जखमी झाला. त्याच्या तक्रारीवरून संदीप कोळी यांच्यासह इतर तीन जण अशा एकूण चार जणांविरुद्ध एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे . तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रदीप पाटील करीत आहेत.