‘सावित्रीमाईचा जन्मोत्सव’ या पन्नास पुस्तकांचे मोफत वितरण

0
70

जळगाव ः प्रतिनिधी
येथील काव्यरत्नावली चौकात शिक्षणाच्या आद्यप्रर्वतक आणि देशातील पहिल्या शिक्षीका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना त्यांच्या जयंतीनिमित्ताने सामाजिक आंदोलनातील पुरोगामी विचारांच्या कार्यकर्त्यांनी अभिवादन केले.
प्रारंभी महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे अध्यक्ष मुकूंद सपकाळे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण केले तसेच क्रांतीज्योती सावित्रीबाई यांच्या स्मृतीस ‘नमन सावित्रीला’ या क्रांतीकारी ओवीचे अ‍ॅड.कोमल गोंधळी यांनी सादरीकरण करून वंदन करण्यात आले. त्याचसोबत छावा मराठा युवा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अमोल कोल्हे यांनी ‘सावित्रीमाईचा जन्मोत्सव’ या पन्नास पुस्तकांचे उपस्थितांना मोफत वितरण केले.
याप्रसंगी मुकूंद सपकाळे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनसंघर्षावर विविध उदाहरणे देऊन क्रांतीमुल विचार मांडून प्रबोधन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक हरिचंद्र सोनवणे यांनी करून सुत्रसंचालन प्रा.प्रितीलाल पवार यांनी केले तर आभार प्रदर्शन अमोल कोल्हे यांनी केले.
यावेळी ‘जयज्योती-जयक्रांती’, क्रांतीज्योती सावित्रीमाई फुलेंचा विजय असो, सावित्रीचे मुले आम्ही मागे आता राहणार नाही अशा जोरदार घोषणांनी परिसर दणाणून सोडला.
याप्रसंगी रमेश सोनवणे, अ‍ॅड. राजश्री भालेराव, मंगलाताई सोनवणे, तेजस्वीनी पाटील, प्रतिभा भालेराव, अ‍ॅड. वनीता शिंदे, चंदन बिर्‍हाडे, श्रीकांत मोरे, प्रभाकर सुरवाडे, सौरभ बोरसे, किरण कानडे, भैय्या पाटील, सागर कुटुंबबडे, चारूदत्त पिंगळे, प्रा.सत्यजीत साळवे, राहूल नेवे, विवेक खर्चे, ललित परदेशी, डॉ. मिलींद बागुल, संजय तांबे, विजय करंदीकर, संतोष सपकाळे, नाना मगरे, कृष्णा जमदाळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here