“प्रत्येक ठिकाणी शासन व प्रशासनाद्वारे जनतेच्या मुलभूत सुविधा व गरजा भागवण्यासाठी वारेमाप पैसा खर्च करून नवीन विकासाच्या दृष्टिकोनातून शहर सुशोभीकरण,गटारी,रस्ते, पथदिवे,व्यापारी संकुलन,बगीचे, सार्वजनिक शौचालय, जलवाहिनी सह विविध योजनेअंतर्गत होणारे कामांच्या दर्जाबाबत सातत्याने जागृत जनतेतून होणारी ओरड व तक्रारींमध्ये तथ्य असले तरी यात संबंधित अधिकाऱ्यांनी वारंवार घेतलेली धृतराष्ट्राची भूमिका बरेच काही सांगून जात आहे.हे मात्र खरे.”
सावदा :- जळगांव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात असलेल्या सावदा न.पा.हद्दीत समाविष्ट सोमेश्वरनगरात लाखों रुपये खर्च करून बांधण्यात येणाऱ्या गटारींचे काम दर्जात्मक न होता.त्यात मातीमिश्रीत वाळूचा सर्रास वापर केला जात असून गटारिच्या भुतळात थेट कच्चे मुरुमचा वापरला जात आहे.यामुळे गटारींचे काम निकृष्ट होत असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते. हे मात्र खरे आहे.तसेच येथील रहिवासी नागरिक देखील असे म्हणतात.यामुळे सदर कामाची पाहणी पालिकेचे प्रशासक उपविभागीय अधिकारी कैलास कडलग यांनी स्वतः करावी.अशी अपेक्षा नागरिकांतून व्यक्त होत आहे.
सदर भागात गटारींचे काम दर्जात्मक व योग्य पद्धतीने होत नसून कुठे गटारीची उंची तर कुठे रूंदी सह निचरा बाबत ठेकेदाराकडून दक्षता घेतली जात नसून पालिका बांधकाम विभागातील प्रशासकीय अधिकारी या नियोजन शुन्य कामाकडे लक्ष न देण्या मागचे कारण म्हणजे ठेकेदारांशी अर्थपूर्ण संबंधचा प्रकार असे नागरिकांतून बोलले जात असून
थेट (निवेदला) इस्टिमेटला बगल देऊन होत असलेले गटारिंचे निकृष्ट बांधकामांची अवस्था व भविष्य हे कुपोषित सारखे दिसून येते.निचराहिन गटारी तुंबण्याची शक्यता वर्तवली जात असून गटारीचे बांधकामात कमी अधिक जाडी बारीक गेजची अंदाजे आसारी वापरली जात आहे.तसेच काँक्रीट कालवताना देखील सिमेंट कमी मात्रेत टाकला जात असून भविष्यात या गटारी किती टिकतील हा देखील प्रश्न समोर येत आहे.
या कामा बाबतीत अनेकदा नागरिकांनी पालिकेत तोंडी तक्रारी केल्या असून मागील ८ ते१० दिवसांपूर्वी याच निकृष्ठ कामाच्या बाबीवरून येथील नागरिकांनी गटारीचे काम बंद पाडले होते.मात्र पुन्हा हे काम निकृष्ठ दर्जाचे होत असल्याने येथील नागरिकांत तीव्र नाराजीचा सूर उमटत आहेत.तरी याकडे सावदा पालिकेचे प्रशासकीय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी कैलास कडलग यांनी लक्ष देणे आवश्यक आहे.तसेच पालिकेतील स्थापत्य अभियंता अविनाश गवळे यांनी लाखांच्या बांधकामा ठिकाणी ठेकेदारावरती अभियंता या श्रेणीच्या कर्मचारीची दररोजच्या देखरेखीसाठी नियुक्ती करून निकृष्ट दर्जाचे होणारे काम उत्कृष्ट दर्जाचे होण्याकामी व्हावे.अन्यथा कुंपणच शेत खात आहे.अशी परिस्थिती निर्माण होण्यासारखी दिसून येते.असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.