सावदा येथे शेत जमीनीची प्लॉटी म्हणून बेकायदा विक्रीची बुकींग सुरू

0
27
भुसावळात आढळला एक नवीन रुग्ण; संख्या चारवरून पाचवर

“पालिकेतील मुख्याधिकारी व नगर रचना विभागा सदर प्रकरणाकडे दुर्लक्ष करून तात्पुरता स्वरुपाची परवानगी देण्याच्या मार्गावर?”

यावल, प्रतिनिधी । रावेर तालुक्यात सावदा नगरपालिका हद्दीतील गट नं.१३५ च्या शेत जमीनीवर न.पा.सह नगर रचना विभाग जळगांव,जिल्हाधिकारी जळगांव येथून नियमानुसार कोणतीच परवानगी न घेता शेत मालकांनी येथील नैसर्गिक नाल्याचे सपाटीकरण करून परस्पर मनाप्रमाणे बेकायदेशीर ले-आऊट बनवून,प्लाट बुकींग पावत्या,तयार केल्याअसून शेत जमीनीचे मोजमाप करून खुणा गाडुन शेत जमीनीला प्लाटीत विभागणी करून लोकांना संपूर्ण सुख सुविधा उपलब्ध न करता अनधिकृतपणे विक्री करत असल्याचा गोरखधंदा राजरोसपणे सुरू असल्याचे संपूर्ण रावेर तालुक्यात बोलले जात आहे.या संदर्भात तक्रारदारांनी मुख्याधिकारी किशोर चव्हाण यांची प्रत्यक्ष भेट घेऊन पुराव्यासह तक्रार दिली असल्याचे सावदा शहरात बोलले जात आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, सावदा नगरपरिषद हद्दीत गटनं.१३५ मध्ये पुर्वापार वर्षापासून कोचुर गावाकडून नैसर्गिक नाला वाहत होता आणि आहे.गेल्या पावसाळ्याच्या दिवसात बेकायदेशीरपणे सदर शेतजमिनीवर परस्पर प्लॉटी दाखविण्यात आल्या आणि नैसर्गिक नाल्याचे सपाटीकरण करण्यात आल्याने सदर परिसरातील रहिवासी लोकांच्या राहत्या घरात पावसाळ्याचे पाणी शिरून गेल्याने याचा त्रास स्थानिकांना सहन करावा लागला.त्यावेळी नगरपालिका प्रशासनाकडून जेसीबी द्वारे तात्पुरत्या स्वरूपात पावसाचे पाणी वाहून जाण्याची विल्हेवाट लावण्या करीता तारेवरची कसरत करून चारी खोदावी लागली होती.तरी सुद्धा सदर नैसर्गिक नाल्याचे बेकायदेशीरपणे सपाटीकरण करणाऱ्यांवर कोणतीच कायदेशीर कठोर कारवाई नगरपालिका प्रशासनाकडून न झाल्याने अनेक प्रश्न उपस्थित केले जात असून संबंधित यंत्रणेच्या कर्तव्याबाबत दाट संशय व्यक्त केला जात आहे.

या संपूर्ण प्रकरणाची अधिकृत माहिती सह नागरीकांची तक्रार देखील पालिका प्रशासनाला प्राप्त असूनही सदर जमिनीला बिनशेती परवानगी करिता तात्पुरता स्वरूपाची परवानगी पालिका प्रशासनाकडून देण्यात येणार असल्याची खात्रीलायक माहिती समजली आहे.?म्हणूनच पुराव्यानिशी नगर रचना विभाग जळगांव व जिल्हाधिकारी जळगांव येथे काही जागरूक नागरिक सदर प्रकरणी लवकरच तक्रार दाखल करणार असल्याचे सावदा शहरात बोलले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here