यावल, प्रतिनिधी । रावेर तालुक्यातील तसेच बुऱ्हाणपूर–अंकलेश्वर महामार्गावर असलेल्या सावदा एस.टी.बस स्थानकात गेल्या20वर्षापासून स्वच्छतागृहाची व्यवस्था नसल्याने हजारो प्रवासी वर्गात तसेच एस.टी.महामंडळ कर्मचाऱ्यांमध्ये,स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.या सार्वजनिक गंभीर समस्येकडे लोकप्रतिनिधीचे अधिकाऱ्यांचे अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे या गंभीर समस्येची तक्रार फैजपूर येथील ललितकुमार नामदेव चौधरी यांनी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केल्याने वरिष्ठ अधिकारी काय कार्यवाही करतात?याकडे संपूर्ण भुसावळ विभागाचे लक्ष वेधून आहे.
रावेर तालुक्यातील सावदा एस.टी.बसस्थानक हे राष्ट्रीय मार्ग बुऱ्हाणपूर-अंकलेश्वर मार्गावरील सामुहिक बाजारपेठ असलेले आणि यावल रावेर तालुक्यातील औद्योगिक,सामाजिक,शैक्षणिक मुख्य रस्ता असलेले परिवहनाचे सावदा रेल्वे स्टेशन5 ते10 किलोमीटरवर असल्याने 25ते30 हजार लोकसंख्या असलेल्या गावाजवळील भव्य अशा नवीन बांधकाम केलेल्या बस स्थानकात दिवसाला लांब पल्ल्याच्या व स्थानिक जिल्हा अंतर्गत दररोज 100ते150 एस.टी.बस फेऱ्या ये- जा करीत असतात.अशा या बसस्थानकात महिलांसाठी व नागरिकांसाठी सुलभ शौचालयाची व्यवस्था नसल्याने तसेच संपूर्ण देशात स्वच्छता मिशन सुरु असताना15 ते20 वर्षापासून प्रलंबित एवढा गंभीर विषय शासनाच्या लक्षात आला नाही किंवा शासनाने लक्ष दिले नाही महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी वेळोवेळी व्हिजिट/ भेटी देऊन तपासणी काय केली? इत्यादी प्रश्न प्रशासनासाठी बेशर्मीचे आणि निर्लज्जपणाचे आहे.
याबाबत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक,महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे जळगाव विभाग जिल्हा प्रबंधक, महाराष्ट्र राज्य मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य महिला आयोग, जिल्हाधिकारी जळगाव यांच्याकडे दि.15ऑक्टोंबर 2021रोजी ई-मेल ने दिलेल्या तक्रार अर्जात ललितकुमार चौधरी यांनी म्हटले आहे की रावेर तालुक्यातील सावदा येथील एस.टी.बस स्थानकात एस.टी. बस प्रवाशांसाठी,एस.टी. कर्मचाऱ्यांसाठी,नागरिकांसाठी बसस्थानक आवारात स्वच्छतागृहांची सुविधा आवश्यक असताना सावदा बस स्थानकात गेल्या20वर्षापासून स्वच्छतागृहांची व्यवस्था नाही हे लोकशाही राज्यातील मोठी व्यथा आणि कथा आहे,काही वादामुळे कोर्ट मॅटर झालेले असल्यास एस.टी.महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी पर्यायी व्यवस्था न करणे हे मोठे दुर्भाग्य म्हणावे लागेल,किंवा न्यायालयातर्फे ‘स्टे’ लागलेला असल्यास इतक्या वर्षापर्यंत ‘स्टे’ कायम राहतो का? न्यायालयीन प्रक्रियेत एस.टी. महामंडळाने काय कार्यवाही केली इत्यादी प्रश्न उपस्थित होत असले तरी एस.टी.महामंडळाकडून सावदा बस स्थानकात स्वच्छतागृहाची पर्यायी व्यवस्था का केली गेली नाही? हा महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होतो.
तरी संबंधित दोषी अधिकारी यांच्यावर कर्तव्यात कसूर केला म्हणून तसेच जनतेला अधिकारापासून वंचित ठेवून सतत20वर्ष छळणे या प्रकरणी कडक कार्यवाही करण्यात यावी. व येत्या आठवड्यात तात्पुरती व्यवस्था करून पुढील कायम स्वरूपाची व्यवस्था करण्याची कार्यवाही सुरु करावी तसेच त्वरित कार्यवाही होणेसाठी संबंधित अधिकाऱ्यांनी संगणकीय प्रणालीचा वापर करून आदेश पत्र काढावेत. अन्यथा यापुढे संबंधित अधिकारी प्रशासन यांच्यावर कार्यवाहीसाठी न्यायालयात दाद मागावी लागेल असे सुद्धा दिलेल्या तक्रारीत ललितकुमार चौधरी यांनी म्हटले आहे.