धरणगाव, प्रतिनिधी । तालुक्यातील साळवे गावातील संत इंदिरानगरमधील रहिवाशी विकास,वसंत व मेघःश्याम बऱ्हाटे यांच्या खासगी मालमत्तेत इतर गटारींचे सांडपाणी सोडण्यात आल्यामुळे किंवा गटारी लिकेजमुळे गेल्या जुन महिन्यापासून त्रास होत आहे.याबाबत उपसरपंचांनी पाहणी करुन सरपंचांना माहिती दिली असली तरी अद्यापपावेतो चार महिने उलटले तरी कोणतीही दखल ग्रामपंचायतने घेतलेली नाही.
यासंदर्भात बऱ्हाटे बंधूंनी 9 सप्टेंबर रोजी साळवे ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकाऱ्यांसह सरपंच व उपसरपंच यांना लेखी स्वरुपात तक्रार अर्ज देऊन, योग्य ते काम करुन सांडपाण्याचा त्रास होणार नाही अशी व्यवस्था करावी,अशी मागणी केली आहे.