सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रखडलेल्या कामांना मिळाली गती  

0
6

जळगाव : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता रुपाली गिरासे ह्यांनी पदभार सांभाळल्या पासून जळगाव सां . बां  च्या अंतर्गत प्रलंबित असलेल्या कामांना गती मिळण्या साठी त्यांनी शर्थीचे प्रयत्न करीत आपल्या विभागाला न्याय देण्याचा यशस्वी प्रयत्न केला असल्याचे दिसून  येत आहे . चार महिन्याच्या कालावधीत च शिवाजी नगर रेल्वे पूल , सावदा रेल्वे पूल , निंभोरा रेल्वे पूल ह्यांची कामे . ह्या सह रखडलेल्या निविदा प्रक्रिया तातडीने पूर्ण करून जळगाव सार्वजनिक विभागातील कामांना गती देण्याचे काम अधीक्षक अभियंता रुपाली गिरासे यांनी  अत्यंत कार्यकुशलतेने  केले आहे .
जळगाव शहरातील महत्वाचा संवेदनशील विषय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिवाजी नगर रेल्वे उड्डाण पुलाचे काम अत्यंत संथगतीने सुरु होते. अधीक्षक अभियंता ह्यांनी कार्यकारी अभियंता , उपविभागीय अभियंता राऊत ह्यांना व संबंधित ठेकेदार ह्यांना वेळोवेळी मार्गदर्शनपर सूचना देत कामाला गती द्या , कामे गुणवत्तेने करा असा पाठपुरावा केल्याने शिवाजीनगर रेल्वे उड्डाण पुलाचे काम गतिमान पद्धतीने मार्गी लागत असल्याचे दिसून येत आहे.
त्याचबरोबर सावदा रेल्वे उड्डाणपूल , निंभोरा रेल्वे उड्डाण,बोदवड रेल्वे उड्डाण पुलांच्या कामांनाही गती आली असून अत्यंत गुणवत्तापूर्वक ही कामे होत असल्याने उत्तर विभागाच्या कार्यकारी अभियंता व ठेकेदार यांचेही जनतेकडून कौतुक होत आहे. या कामांनाही गती देण्याचे काम अधीक्षक अभियंता रुपाली गिरासे यांंनीच केले आहे .   यासह विभागातील डॅमची कामे रखडलेल्या निविदा प्रक्रिया पूर्ण करण्याचे कामही सौ. गिरासे यांच्या कालावधीत झालेे आह. खेडी भोकर येथील तापी पुलाची टेंडर प्रक्रियाही अंतिम टप्प्यात असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे .
काम हिच पूजा – गिरासे
नव्याने पदभार घेतलेल्या अधीक्षक अभियंता रुपाली गिरासे यांनी मागील चार महिन्यापासून आपल्या विभागातील रखडलेल्या व संथगतीने होणाऱ्या कामांना गतिमान केले आहे.सौ.गिरासे यांनी आपल्या कार्यपद्धतीची चुणूक शिवाजीनगर रेल्वे उड्डाणपूल , सावदा रेल्वे उड्डाण पूल,बोदवड रेल्वे उड्डाण पूल व निभोरा रेल्वे उड्डाण पुलांच्या कामांना गुणवत्तापूर्ण गती देऊन दाखवून दिले आहे. याबाबत अधीक्षक अभियंता रुपाली गिरासे यांच्याशी संपर्क साधला असता, काम हिच पूजा असल्याचे त्यांनी सांगितले . यासह होऊ घातलेल्या शासकीय नवीन इमारतीत महिलांना काय सुविधा देता येतील, यासाठीही विशेष तरतूद करणार असल्याचे त्यांनी सांगितले.जास्तीत जास्त रस्ते खड्डेमुक्त करण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here