सामाजिक समरसतेतून राष्ट्रमंदिर उभारणी ः टॉक शोमध्ये मान्यवरांचा सूर

0
58

जळगाव ः प्रतिनिधी
श्रीराम मंदिर निधी समर्पण समितीतर्फे छत्रपती संभाजीराजे नाट्यसंकुलात मंगळवारी टॉक शो झाला. यात अयोध्यानगरीतील भव्य श्रीराम मंदिर निर्माणातील विविध पैलूवर प्रकाश टाकण्यात आला.
भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी (मुंबई) म्हणाले की, रामजन्म भूमीमुक्तीचा लढा हा १५२८ पासूनचा आहे. स्वातंत्र्यानंतर सरदार वल्लभाई पटेल यांनी सोमनाथ मंदिराचा जीर्णोद्धार केला. या वेळी महासभेकडून अयोध्येतही राममंदिर उभारण्याचा प्रश्न पुढे करण्यात आला व समिती स्थापन झाली. हे आंदोलन कुण्या पक्षाची मक्तेदारी नव्हती. राजकीय दृष्ट्या या चळवळीला कोण्या पक्षाच लेबल लावता येणार नाही. सन १९९० पासून या आंदोलनाला राजकीय रंग चढवला, असे भंडारी म्हणले. ऍड. सुशील अत्रे सूत्रसंचालन केले.
सामाजिक वैचारिक भिन्नता दूर करण्याचे काम स्त्रीचेच
अयोध्येच्या उभारणी कार्यात स्त्रीयांचे योगदान हे महत्वपूर्ण राहिले आहे. मात्र ते समोर आलेले नाही. पाच पिठ्या जगण्याचा व सात पिढ्यांचा उद्धार करणारी स्त्रीच आहे. समाजकारणाला मनाने बांधणे यात स्त्रीचे योगदान आहे. रामराज्याची प्रस्तावना होताना यात स्त्री कशी मागे राहील, असा प्रश्नही राष्ट्रसेवक समितीच्या अनघा कुलकर्णी यांनी केला.
अध्यात्मिक साधकांसाठी रामाचे चरित्र आदर्शमय
श्रीरामाच्या चारित्र्यातून आदर्श जीवन जगण्याची उर्मी मिळते. हे चरित्र राष्ट्रासाठी प्रेरणादायी, आचरणीय आहे. राष्ट्रनिर्मितीचे स्वप्न बघताना आदर्श म्हणून रामाचा स्वीकार योग्य आहे. अध्यात्मिक साधकांसाठी रामाचे चरित्र आदर्शमय असल्याचे प्रतिपादन महामंडळेश्वर जनार्दन हरी महाराज यांनी केले.
मंदिरातून आदर्श रामराज्य निर्मितीची पायाभरणी
डॉ. प्रसन्न पाटील (संभाजीनगर) यांनी आज श्रीराम आणि सामाजिक समरसता हा संदेश ठायी ठायी व्यक्त झाला आहे. ही केवळ मंदिर उभारणी नाही, तर आदर्श रामराज्य निर्मितीसाठीची पायाभरणी आहे. जेव्हा राष्ट्र एकात्मतेची भावना जागृत होईल, तेव्हा राष्ट्र आदर्श होईल. यासाठी आत्मीय व समरसतेच्या धाग्याने बांधलेले संबध असावे. धर्म न्यायासाठी रामांनी शस्त्रे हाती घेतली होती. हिमालयापासून ते हिंद सागरापर्यंत त्यांनी समाज एकसंघ केला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने शोषणमुक्त समाज निर्मिती करण्याचे लक्ष ठेवले आहे. बंधुत्वाच्या आधारावर प्रश्नांची सोडवणूक झाली पाहिजे, जातीय अस्मिता टोकदार करण्याचे प्रयत्न सद्या केले जात आहेत. यापुढे सामाजिक भेद दूर करून राष्ट्र बलवान करण्याचे प्रयत्न असावेत, असे प्रतिपादनही त्यांनी केले.
भारत राष्ट्राची गुंफण ही प्रभू रामचंद्रांनी केली आहे. म्हणून देशात, जगात यापुढे लाखो मंदिर उभे राहतीलही; पण या देशाच्या अस्मितेचे प्रतीक म्हणून आम्ही राष्ट्र मंदिर मानतो. मात्र सामाजिक समता असल्याशिवाय हे राष्ट्र मंदिर उभारणे अशक्य असल्याचा सूर ‘राष्ट्र मंदिर टॉक शो ’तून उमटला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here