भुसावळ प्रतिनिधी । एलटीटी-फैजाबाद (०१०६७) साकेत एक्स्प्रेसच्या एस-९ बोगीचे चाक अचानक फुलले. गाडी भुसावळ जंक्शनवर आल्यावर रेल्वे कर्मचाऱ्याच्या लक्षात हा प्रकार आला. यामुळे मोठी दुर्घटना टळल्याची घटना शनिवारी दुुपारी १ वाजता समाेर अाली. यानंतर तातडीने डबा बदलून गाडी पुढील प्रवासासाठी रवाना करण्यात आली.
एलटीटीकडून फैजाबादला जाणारी साकेत एक्स्प्रेस शनिवारी दुपारी १.०२ मिनिटांनी भुसावळ रेल्वे स्थानकावर अाली. यानंतर नेहमीप्रमाणे रेल्वे कर्मचाऱ्यांनी गाडीच्या डब्यांची खालील बाजूने तपासणी सुरू केली. त्यात कर्मचारी एमसीएम आशिष चाैधरी यांना इंजिनपासून ११ व्या क्रमांकाच्या एस-९ या डब्याचे एक चाक फुललेले आहे, असे लक्षात अाले. त्यांनी हा प्रकार वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगितला. यानंतर अधिकाऱ्यांनी एस-९ या डब्याच्या चाकांची पाहणी केली. त्यात एक चाक फुलल्याचे दिसले. यामुळेच आकार बदलून ते आवाज करत असल्याचे समजले. यानंतर हा डबा बदलण्याचा निर्णय अधिकाऱ्यांनी घेतला. दरम्यान, बोगीचे चाक खराब झाल्याचे कळाल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण होते. स्थानक संचालक जी.अार.अय्यर व अन्य अधिकाऱ्यांनी या बोगीतील प्रवाशांना खाली उतरवले. यानंतर एस.-९ एलएचबी बोगी काढून तिथे एसी-३ डबा जाेडण्यात अाला. या सर्व प्रक्रियेला ३.४५ तासांचा वेळ लागल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
नाशिक स्थानकापासून दुर्लक्ष? चाैकशी होणार
ही गाडी मुंबईकडून येताना एकाही रेल्वे कर्मचाऱ्याच्या लक्षात हा गंभीर प्रकार कसा आला नाही? असा प्रश्न या घटनेनंतर उपस्थित झाला. यापूर्वी नाशिक राेड स्थानकापासून कुठेही गाडीचे निरीक्षण झाले नाही का? याची अधिकारी चौकशी करणार आहेत. दरम्यान, भुसावळात हा प्रकार लक्षात आला नसता तर अपघातासारखी मोठी दुर्घटना घडली असती. त्यामुळे अधिकाऱ्यांनी आशिष चाैधरींचे कौतुक केले.
प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण होते. स्थानक संचालक जी.अार.अय्यर व अन्य अधिकाऱ्यांनी या बोगीतील प्रवाशांना खाली उतरवले. यानंतर एस.-९ एलएचबी बोगी काढून तिथे एसी-३ डबा जाेडण्यात अाला. या सर्व प्रक्रियेला ३.४५ तासांचा वेळ लागल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. साकेत एक्स्प्रेसच्या एस-९ बोगीच्या चाकांची तपासणी करताना रेल्वे कर्मचारी. त्यात एक चाक फुलल्याचे समोर आहे. यानंतर बोगीच बदलण्यात आली.