भुसावळ : प्रतिनिधी
येथील सहकारी औद्योगिक वसाहत मर्यादित भुसावळच्या संचालक मंडळाच्या झालेल्या सभेत सन 2021-2022 ते 2025-2026 या कार्यकाळाकरिता बिनविरोध सभापतीपदी अजय पाटील तर उपसभापतीपदी जगदीश नारखेडे यांची निवड करण्यात आली.
याप्रसंगी सहाय्यक निबंधक सहकारी संस्था अधीन निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मनोज चौधरी व एस.डी.उचित यांनी काम पाहिले. या सभेस संस्थेचे संचालक प्रभाकर पाटील, विष्णु चौधरी, जयश्री पाटील, महम्मद नासीर मेमन, ज्ञानेश्वर सोनवणे, प्रेमचंद पाटील, शांताबाई झोपे, अतुल महाजन, मिलिंद अग्रवाल व व्यवस्थापक खुशाल पाटील यांची उपस्थिती होती.