समता नगरमधील ‘त्या’ आरोपीवर प्रतिबंधात्मक कारवाई करुन जामीन रद्द करा

0
27

जळगाव : प्रतिनिधी
रामानंद नगर पोलिस स्टेशनमध्ये १७ डिसेंबर १९ रोजी एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यासोबत अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा रजिस्टर क्रमांक २०९/१९ प्रमाणे गुन्हा दाखल असून त्यात भादवी कलम ३७६,३६३,३५४,३६६ व पोकसो कलम ३ व ४ प्रमाणे गुन्हा नोंद असून पाच आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोपण पत्र दाखल झाले असून त्याचा न्यायालयातील स्पेशल केस क्रमांक ९६/२० आहे. या पाच आरोपींपैकी चार आरोपींची जामीनावर सुटका झाली असून एक आरोपी अद्याप फरार आहे.
मुख्य आरोपी बनसोडेची पुनरावृत्ती
यातील प्रमुख आरोपी सुमित उर्फ मोन्या सुधाकर बनसोडे रा. समतानगर जळगाव यांनी त्याच पीडितेला दि.२३ फेब्रुवारी रोजी पुनश्च अपहरण करून घेऊन गेला म्हणून पीडितेच्या आईने पुनश्च रामानंदनगर पोलिस स्टेशनला जाऊन तक्रार केली असता मिसिंग कंप्लेंट नोंदवून घेण्यात आली व २६ फेब्रुवारीला त्या पीडितेला व आरोपीला पोलीस स्टेशनला जमा करण्यात आले.पीडितेची आई, वडील, भाऊ तिला घ्यायला गेले असता त्या पीडितेने त्यांच्या सोबत येण्यास नकार दिला व मी याच आरोपी सोबत राहील असे सांगितले.
पिडीतेवर एका वर्षात दबाव
पीडिता व आरोपी हे एकाच गल्लीत राहत असल्याने व न्यायालयात केस बोर्डवर येत असल्याने आरोपीने पीडितेच्या आई व पीडितेला १८ फेब्रुवारी रोजी धमकी दिली होती की,केस परत न घेतल्यास तुम्ही तुमचे बघून घ्या व २३ फेब्रुवारी रोजी पळवून नेले. तीन दिवस सोबत ठेऊन परत आणले असता पीडितेने आपल्या आईस सांगितले की,आपण जी केस केली आहे ती परत घ्या नाहीतर मी आरोपी सोबतच जाईल.पीडिता आता १८ वर्षाची झाल्याने तिने हा निर्णय घेतला परंतु तो निर्णय भीती पोटी घेतला असावा ही शक्यता आहे.
सदर आरोपीविरुद्ध याच पीडितेने न्यायालयास समक्ष १६४ चा कबुलीजबाब देऊन तिच्यासोबत झालेल्या अन्यायाची आपबिती नमूद केली आहे म्हणून पोलिसांनी तात्पुरत्या स्वरूपात तीस आशादीप वसतिगृहात ठेवले आहे.
दोन समाजामध्ये तेढ होण्याची शक्यता
याप्रकरणी दोन समाजात तेढ निर्माण होऊ नये म्हणून जळगाव जिल्हा मनियार बिरादरीचे अध्यक्ष फारुक शेख, महिला सुरक्षा समितीच्या निवेदिता ताठे व रोशनी फाऊंडेशनचे अन्वर खान यांनी पोलीस अधीक्षक डॉ.मुंडे व पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले व त्यात सदर आरोपीवर त्वरित प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात यावी तसेच सदर आरोपी हा पीडिता, तिचे नातेवाईक व साक्षीदारांवर दबाव आणीत असल्याने त्यांचा जामीन रद्द करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे.सदर निवेदनाच्या प्रती जिल्हा सत्र न्यायाधीश व सहाय्यक पोलीस अधीक्षक जळगाव यांना सुद्धा देण्यात आलेल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here