सणासुदीच्‍या काळानिमित्त अॅमेझॉन इंडियाकडून११०,००० हून अधिक हंगामी रोजगार संधींची निर्मिती

0
71

 

  • विविध पार्श्‍वभूमींमधील, तसेच जीवनाच्‍या विविध स्‍तरांमधील व्‍यक्‍तींसाठी या संधी खुल्‍या आहेत

नाशिक: अॅमेझॉन इंडियाने आज सणासुदीच्‍या काळानिमित्त त्‍यांच्‍या कार्यसंचालन नेटवर्कमध्‍ये ११०,००० हून अधिक हंगामी रोजगार संधींची निर्मिती केल्‍याची घोषणा केली आहे. अर्थपूर्ण रोजगार निर्माण करण्‍याप्रती कटिबद्धता कायम राखत या संधींमध्‍ये भारतभरातील मुंबई, दिल्‍ली, पुणे, बेंगळुरू, हैदराबाद, कोलकाता, लखनौ व चेन्‍नई या शहरांमधील प्रत्‍यक्ष व अप्रत्‍यक्ष रोजगारांचा समावेश आहे. या बहुतांश नवीन नियुक्‍तींना अॅमेझॉनच्‍या विद्यमान सहयोगी नेटवर्कमध्‍ये सामील करण्‍यात आले आहे आणि त्‍यांना सुरक्षितपणे व कार्यक्षमपणे ग्राहकांच्‍या ऑर्डर्स पिक-अप, पॅकिंग, शिपिंग व डिलिव्‍हर करण्‍यासाठी साह्य करण्‍यात येईल. नवीन नियुक्‍तींमध्‍ये कस्‍टमर सर्विस सहयोगींचा देखील समावेश आहे, ज्‍यापैकी काहीजण घरातून आरामात काम करण्‍याची सुविधा देणा-या व्‍हर्च्‍युअल कस्‍टमर सर्विसचा भाग आहेत.

अॅमेझॉनने या महिन्‍याच्‍या सुरूवातीला भारतामध्‍ये त्‍यांच्‍या पहिल्‍याच ‘करिअर डे’दरम्‍यान जाहिर केलेल्‍या ८,००० रोजगार संधींमध्‍ये या नवीन रोजागारांची भर करण्‍यात आली आहे. या हंगामी संधी अॅमेझॉन इंडियाच्‍या वर्ष २०२५ पर्यंत देशामध्‍ये १ दशलक्ष नवीन रोजगार संधी निर्माण करण्‍याप्रती असलेल्‍या कटिबद्धतेमधील आणखी एक पाऊल आहे.

”सणासुदीच्‍या काळामध्‍ये देशभरातील ग्राहक त्‍यांच्‍या शॉपिंग ऑर्डर्सच्‍या सुरक्षित, विश्‍वसनीय व जलद डिलिव्‍हरीसाठी अॅमेझॉनवर अवलंबून असतात. ११०,००० हून अधिक अतिरिक्‍त कर्मचारी आम्हाला आमच्या फुलफिलमेंट, डिलिव्‍हरी आणि ग्राहक सेवा क्षमता प्रबळ करण्‍यामध्‍ये, तसेच अपवादात्‍मक ग्राहक अनुभव देण्‍यामध्‍ये साह्य करतील. ही नियुक्‍ती लाखो व्‍यक्‍तींना उदरनिर्वाह व आर्थिक स्‍वावलंबतेसंदर्भात देखील साह्य करेल. आमचे कर्मचारी करत असलेल्‍या प्रयत्‍नांमध्‍ये विविधता, समानता व सर्वसमावेशकतेला प्राधान्‍य दिले जात असताना आम्‍ही जीवनाच्‍या सर्व स्‍तरांमधील सहयोगींचे स्‍वागत करतो, ज्‍यामुळे आम्‍हाला भारतभरातील ग्राहक व विक्रेत्‍यांना सणासुदीच्‍या काळादरम्‍यान उत्‍साहपूर्ण आनंद देण्‍यास मदत होईल,” असे अॅमेझॉनचे कस्‍टमर फुलफिलमेंट ऑपरेशन्‍स, एपीएसी, एमईएनए व लॅटमचे उपाध्‍यक्ष अखिल सक्‍सेना म्‍हणाले.

कंपनी विकलांग, महिला, मिलिटरी दिग्‍गज आणि एलजीबीटीक्‍यूआयए+ समुदाय अशा कमी प्रातिनिधिक समूहांसाठी रोजगार संधी निर्माण करण्‍याप्रती काम करत आली आहे. यंदा हंगामी नियुक्‍तीने ५० टक्‍क्‍यांहून अधिक महिला, जवळपास ६० टक्‍क्‍यांहून अधिक विकलांग व्‍यक्‍ती आणि गेल्‍या वर्षभरात एलजीबीटीक्‍यूएआय+ प्रतिनिधित्‍वामध्‍ये १०० टक्‍क्‍यांहून अधिक वाढ करण्‍यासह सर्वसमावेशक कर्मचारीवर्ग नियुक्त केला आहे.

‘मी नुकतेच अॅमेझॉनच्‍या फुलफिलमेंट सेंटरमध्‍ये काम करायला सुरूवात केली आहे, जेथे मी कस्‍टमर ऑर्डर्सची पॅकिंग करते. मला कामाचे वातावरण आणि आम्‍हाला देण्‍यात आलेल्‍या सुविधा खूप आवडल्‍या आहेत. इमारतीमध्‍ये काम करणा-या प्रत्‍येक कर्मचा-याचे आरोग्‍य व सुरक्षिततेकडे विशेष लक्ष दिले जाते. मला माझ्या कुटुंबाला साह्य करण्‍याचा आनंद होत आहे,” असे अॅमेझॉन इंडिया येथे नुकतेच हंगामी नियुक्‍ती करण्‍यात आलेल्या जयश्री सामंता म्‍हणाल्या.

२०२१ मध्‍ये अॅमेझॉन इंडियाने त्‍यांचे फुलफिलमेंट व डिलिव्‍हरी नेटवर्क विस्‍तारित केले. आता त्‍यांचे १५ राज्‍यांमध्‍ये ६० हून अधिक फुलफिलमेंट सेंटर्स, १९ राज्‍यांमध्‍ये सॉर्ट सेंटर्स, १७०० हून अधिक अॅमेझॉन मालकीचे व सहयोगी डिलिव्‍हरी स्‍टेशन्‍स, जवळपास २८,००० ‘आय हॅव स्‍पेस’ सहयोगी आणि हजारो अॅमेझॉन फ्लेक्‍स डिलिव्‍हरी सहयोगी आहेत. सर्वजण कोविड-१९ शी संबंधित आव्‍हानांचा सामना करत असताना अॅमेझॉन इंडिया त्‍यांच्‍या कार्यसंचालन नेटवर्कमधील त्‍यांच्‍या कर्मचा-यांचे स्‍वास्‍थ्‍य व सुरक्षिततेवर सर्वाधिक भर देते. अॅमेझॉन इंडियाने देशभरातील आघाडीच्‍या आरोग्‍यसेवा प्रदात्यांसोबत सहयोगाने राबवलेल्‍या लसीकरण मोहिमांच्‍या माध्‍यमातून त्‍यांचे सहयोगी, कर्मचारी व त्‍यांच्‍यावर निर्भर असलेल्‍या कुटुंबियांसाठी जवळपास ३ लाख लसीकरण पूर्ण केल्‍याची घोषणा केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here