संस्थेने केलेल्या बदल्या व पदोन्नती प्रस्तावास तात्काळ मान्यता प्रदान करा

0
30

जळगाव ः प्रतिनिधी
मविप्र संस्थेचे मानद सचिव निलेश भोईटे यांनी सन २०१८ पासून पदोन्नतीचे दिलेले प्रस्तावास आपल्या कार्यालयाने मान्यता आजतागायत दिलेली आहे. आम्ही मुख्याध्यापक देखील याचं संचालक मंडळाचे आदेश मानत आलोय… आमच्या संस्थेत कार्यालय देखील एकच आहे, तिथून निलेश भोईटे यांचे संचालक मंडळ कारभार सुरळीत सुरु असून संस्थेने केलेल्या बदल्या व पदोन्नती प्रस्तावास तात्काळ मान्यता प्रदान करण्यात यावे या मागणीसाठी मविप्र संस्थेच्या सर्व २८ मुख्याध्यापकांनी शिक्षणाधिकारी यांना काल रोजी निवेदन दिले.
मुख्याध्यापकांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, संस्थेने शाखेवार कर्मचार्‍यांच्या विनंतीवरून तसेच प्रशासकीय कारणास्तव केलेल्या बदल्या व पदोन्नती यांना मान्यता मिळू नये, कर्मचार्यांना वेठीस धरणे तसेच बदली झालेल्या जवळच्या लोकांना संस्थेत चुकीची व भ्रमित माहिती पुरवीत आहे. काही विघ्नसंतोषी व्यक्ती आपली व आपल्या कर्मचार्‍यांची दिशाभूल करतात तसेच आपणास व आपल्या कार्यालयात अर्जफाटे करून आपली व आपल्या कार्यालयाची दिशाभूल करतात त्याच पद्धतीने आपणही आपले निर्णय
फिरवित असतात. आपल्या कार्यालयाने सन २०१८ ते आज पर्यंत सर्व निर्णय निलेश रणजीत भोईटे मानद सचिव यांच्याचं स्वाक्षरीने केलेल्या बदल्या – पदोन्नती, पेन्शन प्रस्ताव यांना आपण मान्यता दिलेल्या आहेत व त्याचप्रमाणे सेवानिवृत्त कर्मचार्‍यांच्या त्याचा लाभ मिळालेला असून ते आज पेन्शनचा लाभ घेत आहेत. त्याचप्रमाणे आजतागायत एकही मान्यता दुसर्‍या संचालक मंडळाच्या सहीने झालेल्या नाहीत कारण मविप्र संस्थेत दुसरे संचालक मंडळ अस्तित्वात नाही तर साहेब वाद कसला? ज्यांनी आता संस्थेत वाद आहे असे पत्र दिले आहे ते कोणत्या संचालक मंडळात होत.े त्यांच्या नातेवाईकांच्या व जवळच्या व्यक्तींच्या बदल्या, पदोन्नती यांना देखील आपल्या कार्यालयाने मान्यता दिली आहे..सहाय्यक धर्मदाय आयुक्त सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय जळगाव यांच्याकडे फक्त निलेश रणजीत भोईटे यांचा फेरफार अर्ज क्रमांक १०८/ २०१८, सन २०१८ ते २०२२ या कालावधीचा संचालक मंडळ फेरफार अर्ज दाखल आहे.या कालावधीत दुसर्‍या कोणाचा फेरफार अर्ज दाखल नाही तसेच आढळून येत नाही. धर्मदाय आयुक्त यांनी सहसंचालक उच्च शिक्षण जळगाव विभाग जळगाव २६ -२७/३/१९ या पत्रात नमूद केले आहे त्यानुसार निलेश रणजीत भोईटे मानद सचिव यांचे संचालक मंडळ कायदेशीर कार्यरत आहे.औरंगाबाद खंडपीठ तसेच शिक्षण उपसंचालक नाशिक यांच्या आदेशात सुद्धा निलेश भोईटे यांचेच संचालक मंडळ कायदेशीर कार्यरत आहे असे आदेश पारित करण्यात आलेला आहे.
शिक्षण उपसंचालक नाशिक विभाग नाशिक यांच्याकडे तक्रार केली होती त्या ठिकाणी आम्ही त्यांना दिलेल्या पत्राचे उत्तर देऊन समाधान झाले त्यामुळे त्यांनी तात्काळ कर्मचार्‍यांच्या बदल्या मंजुरी प्रदान केलेल्या आहेत. तरी आम्ही आपणास नमूद करतात की या संस्थेने मानद सचिव निलेश भोईटे व संचालक विश्‍वस्त मंडळ कायदेशीर कार्यरत आहे. व त्याचे आदेश आम्ही मान्य करत असून यापुढेही मानणार आहे त्याप्रमाणे संस्थेशी संबंधित असलेल्या सर्व शैक्षणिक शाखांची कोणत्या प्रकारची माहिती व पत्रव्यवहार हा आपल्या कार्यालयाच्या संस्थेशी करावा यामुळे गैरसमज निर्माण होणार नाही. संस्थेने केलेल्या बदल्या, पदोन्नतींना तत्काळ मान्यता प्रदान करण्यात यावे असे विनंती करणारे निवेदन मुख्याध्यपकांनी दिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here