मलकापूर प्रतिनिधी: संत रोहिदास महाराज यांनी समानतेचा संदेश देत सन्मानाने जगण्याचा संदेश दिला तसेच संत रोहिदास महाराज यांची समाजसुधारक म्हणून ख्याती आहे त्यांनी गरीब कुटुंबात जन्म घेऊन देखील प्रत्येक समाजाने सन्मानाने जगले पाहिजे असे महान विचार त्यांचे होते असे प्रतिपादन अशांतभाई वानखेडे समतेचे निळे वादळ संस्थापक अध्यक्ष तथा नगरसेवक यांनी संत रोहिदास महाराज जयंती च्या कार्यक्रमामध्ये अध्यक्ष स्थानावरून बोलताना व्यक्त केले. यावेळी रोहिदास नगर येथे संत रोहिदास महाराज जयंतीचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी सर्व प्रथम छत्रपती शिवाजी महाराज ,भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, संत रोहिदास महाराज यांच्या प्रतिमांना त्रिवार अभिवादन करून मेणबत्ती, अगरबत्ती प्रज्वलित करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली त्यावेळी विचार मंचावर उपस्थित माजी आमदार चैनसुख संचेती, नगरसेवक बंडूभाऊ चवरे, नगरसेवक अनिल बगाडे, भाजप महामंत्री मोहन शर्मा ,राष्ट्रीय विश्र्वगामी पत्रकार संघटनेचे जिल्हा अध्यक्ष सतीश दांडगे,सुरेश आडसुरे, संदीप राजपूत, भावसिंग पठ्ठे ,शालिग्राम काथोडे, हरिदास गनबास, किशोर कराडे , अमोल टप ,हनुमान सेना आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक भावसिंग पट्टे यांनी केले
तर कार्यक्रमाचे आयोजन साहेबराव खराटे , किशोर गनबास,अमोल हरसुळकर ,शंकर पट्टे, संतोष पिंपळे, नितीन परसे, नितेश कराटे, किशोर सोनवणे,राजू परसे, आदींनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आशिष पठ्ठे तर आभार प्रदर्शन सुरेश उतपुरे सर यांनी केले कार्यक्रमाला बहु संख्येने उपस्थित होते.