जळगाव ः प्रतिनिधी
उमाळा रोड, नशिराबाद येथील श्री साईराम प्लास्टिक अॅन्ड इरिगेशन कंपनीच्या दिनदर्शिका-२०२१ चे प्रकाशन दर्जी फाऊंडेशन चे संचालक गोपाल दर्जी व उपशिक्षण अधिकारी (प्राथमिक ) विजय पवार यांचे हस्ते करण्यात आले.
श्री साईराम प्लास्टिक अॅन्ड इरिगेशन दरवर्षी दिनदर्शिका प्रसिद्ध करुन आपल्या सन्माननीय शेतकरी ग्राहकांना वितरीत करीत असते. या दिनदर्शिकेत विविध तिथी व नाविन्यपूर्ण माहितीचा समावेश असतो.
यावेळी श्री साईराम प्लास्टिक अॅन्ड इरिगेशनचे अध्यक्ष श्रीराम पाटील, संचालक प्रमोद पाटील, महाव्यवस्थापक धनराज चौधरी, प्रविण महाजन, प्रविण पाटील, जयवंत भालेराव व इतर मान्यवर उपस्थित होते. सुत्रसंचालन जयवंत भालेराव यांनी तर प्रास्ताविक धनराज चौधरी यांनी केले.