श्री माहेश्वरी युवा संघठनतर्फे जळगावात चार दिवसीय अ‍ॅड. बबनभाऊ बाहेती स्मृती चषक क्रिकेट स्पर्धेला सुरूवात

0
18

जळगाव, प्रतिनिधी । श्री माहेश्वरी युवा संघठन, जळगाव शहरतर्फे आयोजित चार दिवसीय स्वर्गीय क्रीडामहर्षी अ‍ॅड. बबनभाऊ बाहेती स्मृती चषक (नाईट क्रिकेट टुर्नामेंट) २०२१-२२ (१७ वे वर्ष) या क्रिकेट स्पर्धेला गुरुवार, दि. २३ डिसेंबर २०२१ रोजी सायंकाळी ७ वाजता शहरातील शिवतीर्थ तथा जी.एस.ग्राऊंडवर उत्साहपूर्ण वातावरणात सुरूवात झाली.

दरम्यान, माजी महापौर व नगरसेवक नितीन लढ्ढा, रोहन बाहेती, अ‍ॅड. नारायण लाठी, योगेश कलंत्री व शाम कोगटा यांच्या हस्ते टुर्नामेंटचे उद्घाटन झाले. यावेळी समाजातील अनेक मान्यवर उपस्थित होते. या टूर्नामेंटमध्ये २० संघ, २४० खेडाळूंनी भाग घेतला असून एकूण ४० साखळी सामने होणार आहे. ही स्पर्धा रविवार, दि. २६ डिसेंबर २०२१ पर्यंत खेळली जाणार आहे.

या क्रीडामहर्षी अ‍ॅड. बबनभाऊ बाहेती स्मृती चषक (नाईट क्रिकेट टुर्नामेंट) साठी श्री माहेश्वरी युवा संघठन, जळगाव शहराचे अध्यक्ष मधुर झंवर, सचिव अक्षय बिर्ला, कार्याध्यक्ष अभिलाष राठी, उपाध्यक्ष अक्षय लढ्ढा, कोषाध्यक्ष संकेत जाखेटे, सहसचिव आदित्य बेहेडे, संघठनमंत्री संतोष समदाणी, कपिल लढ्ढा, सांस्कृतिक मंत्री अर्पित बेहेडे, क्रीडामंत्री स्मितेश बिर्ला, पीआरओ गणेश लढ्ढा, हर्षल तापडिया, कपिल चितलांगे, कार्य समितीचे अभिषेक झंवर, विष्णू मुंदडा, सचिन लाहोटी, संकेत लढ्ढा, शुभम जाखेटे, कल्पेश काबरा, अनिमेश मुंदडा, राज तापडिया, पियुष समदाणी यांनी परिश्रम घेतले. तसेच पदेन सदस्य डॉ. गोविंद मंत्री, निलेश झंवर, रूपेश काबरा, कौशल मुंदडा, प्रीतम लाठी, सल्लागार राहुल लढ्ढा, अमित झंवर, आनंद भुतडा, अरुण लाहोटी, भूषण भुतडा यांनी टुर्नामेंटसाठी विशेष मार्गदर्शन केले.

या स्पर्धेत २० संघ सहभागी झाले असून, स्पर्धेतील विजेत्यास व उपविजेत्यास चषक देण्यात येणार असून उत्तम बॅटस्मन, बॉलर आणि फिल्डर या खेळाडूंचाही सन्मान करण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी अ‍ॅड.बबनभाऊ बाहेती प्रतिष्ठान, आदित्य फार्म, केएमसी स्पेशल फिल्टर्ड मुंगफल्ली तेल, हॉटेल मथुरा व्हेज, बेहडे उद्योग, लिटिल मिलेनियम स्कूल, लढ्ढा क्लासेस, आकृती बिल्डर्स, वासुकमल इन्फ्रा बिल्डर्स, दाल परिवार, युगश्री जय साई वेअरहाऊस व मल्टी मीडिया फीचर्स प्रा लि यांचे बहुमोल सहकार्य लाभले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here