भुसावळ : प्रतिनिधी
श्रीराम मंदिराच्या निर्माणासाठी आपला खारीचा वाटा असावा. कारण प्रभु रामचंद्र हे प्रत्येक हिंदूच्या हृदयातील अढळ असे स्थान आहे. त्यामुळे ऐतिहासिक कार्य होत असून आपल्याला या धार्मिक कार्यात सहभागी होता आले हे आपले भाग्य असून यासाठी प्रत्येकाने आपले आर्थिक योगदान दिले पाहिजे, असे आवाहन माजी नगराध्यक्ष युवराज लोणारी यांनी केले. अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या भव्य निर्माणासाठी निधी संकलन समितीद्वारे काशिराम नगर परिसरात कॉर्नर बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
सदर बैठक ही छत्रपती ग्रुपच्या माध्यमातून आयोजित करण्यात आली होती. यावेळी छत्रपती ग्रुपचे संस्थापक माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक युवराज लोणारी, नपाच्या माजी शिक्षण समिती सभापती तथा भाजप महिला आघाडी शहराध्यक्ष मिना लोणारी, कारसेवक तथा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दिलीप ओक, कारसेवक प्रा. संजय बाविस्कर, कारसेवक तथा ‘साईमत’चे उपसंपादक राकेश कोल्हे, राष्ट्रवादीचे ज्ञानेश्वर पाटील, संतोष मराठे, निधी संकलन समितीचे मोहल्ला प्रमुख दिपक सुरवाडे आदींची उपस्थिती होती.
याप्रसंगी कारसेवक तथा ‘साईमत’चे उपसंपादक राकेश कोल्हे बोलतांना म्हणाले की, श्रीराम मंदिराच्या निर्माणासाठी प्रत्येक धर्माच्या जातीच्या नागरीकांनी यात राष्ट्रीय कार्य म्हणून सहभागी व्हावे. कारण भव्य राम मंदिराचे निर्माण होणे हे आपले प्रत्येक भारतीयांची आस्था असून या राष्ट्रीय कार्यात सहभागी होत निधी संकलनाचे कामी आपले योगदान द्यावे. यावेळी प्रा.संजय बावीस्कर, दिलीप ओक, संतोष मराठे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या उभारणीसाठी देशातील प्रत्येक नागरीकाची आस्था जुळलेली आहे. या उदात्त भावनेतून श्रीराम मंदिराच्या ट्रस्टच्या माध्यमातून निधी संकलन समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीचे काम समाजातील शेवटच्या घटकाला समजावे, निधी संकलनाचे महत्त्व पटावे यासाठी या समितीद्वारे गावागावात, मोहल्ल्यामोहल्ल्यात कॉर्नर बैठकांच्या माध्यमातून जनजागृती केली जात आहे. अयोध्येतील राम मंदिराचे निर्माण कोरीव दगडी खांबातून होत असून या मंदिराच्या प्रत्येक मजल्याची उंची सुमारे २० फूट राहणार असून लांबी ३६० फूट तर रुंदी २३५ फूट असणार आहे. मंदिराचा पाया हा जमिनीपासून सुमारे साडेसोळा फूट उंच राहणार असून याबाबत आयआयटी मुंबई, आयआयटी दिल्ली, आयआयटी चेन्नई, आयआयटी गुवाहटी, सीबीआयई खडकी तसेच लार्सन अॅण्ड टुब्रो, टाटा यांच्या अभियंत्यांची आपसात विचारविर्मश होत आराखडा अंतिम टप्प्यात आला असून लवकरच मंदिराचे स्ट्रक्चर जनतेसमोर जारी केले जाणार आहे.
यावेळी राजेंद्र भागवत, छत्रपती ग्रुपचे कपील लोणारी, गौरव लोणारी, राजेंद्र आमोदकर, नरेंद्र सोनवणे, संदीप सोनागरे, किरण तायडे, अॅड. प्रशांत भागवत, वैभव लोणारी, राध्येशाम नांदुरकर, शुभम सोनवणे, प्रतिक सोनवणे, तुषार तायडे, किरण बेलसकर, भुषण गवळे, अतुल पाटील, अमर सुरडकर, विजय सोनवणे, संजय विश्वकर्मा, भुषण सपकाळे, अतुल सपकाळे, गणेश लोहार, विष्णू खेडवण, रमाकांत पाटील, मनोहर जोशी, अशोक कुलकर्णी, कैलास चौधरी, ऋषी अग्रवाल, प्रमोद अग्रवाल, सचिन जोनवाल, वसंत पाटील, सुरेश पाटील, राजेश सपकाळे, वासुदेव तायडे, राजेंद्र धांडे, जीवन गोराडकर, हेमंत सावंत, छगन चौधरी, चंद्रकांत बर्हाटे, स्वप्निल बोरनारे, ज्ञानेश्वर पवार, शुभम चौधरी आदींसह परिसरातील महिला व नागरीक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.