श्रीनगर-विद्यानगरला जोडणारा पुल वाहतुकीसाठी होणार खुला

0
41

भुसावळ : प्रतिनिधी
शहरातील श्रीनगर ते विद्यानगर या दोन्ही भागांना जोडणार्‍या बलबलकाशी नाल्यावरील पुलाचे काम पूर्ण झाले असून हा पूल लवकरच वाहतुकीसाठी खुला होणार असल्याची माहीती माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक युवराज लोणारी यांनी दिली . यामुळे प्रभाग ७ व ८ मधील सुमारे आठ हजार नागरिकांना दिलासा मिळणार आहे.
विद्यानगर ते श्रीनगर या दोन्ही भागांना जोडण्यासाठी बलबलकाशी नाल्यावर अनेक वर्षांपासून छोटा पाइप टाकून पूल तयार करण्यात आला होता. यावरुन केवळ मोटारसायकल वापरत होती. पावसाळ्यात नाल्याला पूर येताच हा मार्ग बंद होत असल्याने दोन्ही भागांत वापरण्यासाठी जळगाव रोडवर यावे लागत होते. या ठिकाणी मोठ्या पुलाची गरज ओळखून माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक युवराज लोणारी यांनी १४ व्या वित्त आयोगातून ३४ लाख रुपयांचा निधी मंजूर करवून घेतला. यानंतर अवघ्या तीन महिन्यांमध्ये हा पूल पूर्ण झाला. पुलाला देान्ही बाजूंनी जोडणारे रस्तेही तयार झाल्याने काही दिवसांतच वाहतूक सुरू होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here