Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»अमळनेर»‘श्रीं’च्या आशिर्वादाने आमदार म्हणून जनतेची सेवा करण्याची संधी प्राप्त
    अमळनेर

    ‘श्रीं’च्या आशिर्वादाने आमदार म्हणून जनतेची सेवा करण्याची संधी प्राप्त

    saimat teamBy saimat teamDecember 14, 2020No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    अमळनेर ः प्रतिनिधी
    ‘श्रीं’च्या आशिर्वादाने आमदार म्हणून जनतेची सेवा करण्याची संधी प्राप्त असल्याचे मत आ.अनिल पाटील यांनी अक्कलकोट संस्थानला दिलेल्या भेटप्रसंगी व्यक्त केले.
    यावेळी बोलतांना आ.पाटील म्हणाले की, श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांचे मार्गदर्शन बहुमोल असल्यानेच न्यासाचे प्रमुख कार्यकारी विश्‍वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली चौफेर प्रगती साधत आहे. ज्या-ज्या वेळी तीर्थक्षेत्र अक्कलकोटला येतो त्या-त्या वेळी अन्नछत्र मंडळास आवर्जून भेट देतोच, असे म्हणताना ‘श्रीं’च्या आशिर्वादाने आमदार म्हणून जनतेची सेवा करण्याची संधी प्राप्त झाल्याचे मनोगत आ.अनिल पाटील यांनी व्यक्त केले. ते श्री क्षेत्र अक्कलकोट तेथे सहकुटुंब श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात आले असता मंडळाचे सचिव शामराव मोरे यांच्याहस्ते ‘श्रीं’ची मूर्ती, प्रतिमा, कृपावस्त्र व श्रीफळ देऊन मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला. पुढे बोलताना आ.अनिल पाटील म्हणाले की, श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाने एका छताखाली स्वामी भक्तांना मुलभूत सोयी सुविधा बरोबरच पर्यटनास चालना देण्याचे काम न्यासाकडून होत आहे. आमदार म्हणून श्रींचे दर्शन घेताना मनस्वी आनंद झाला. स्वामींचा आशिर्वाद व महाप्रसाद घेऊन जाताना जनतेची सेवा प्रामाणिकपणे होईल, हे कर्तव्य घेऊन श्रीक्षेत्र अक्कलकोट मधून जात असल्याचे आ.पाटील यांनी सांगितले.
    आ.पाटील यांच्या समवेत जि.प.सदस्या जयश्री अनिल पाटील, त्यांच्या मातोश्री पुष्पलता पाटील, या अक्कलकोटचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुका अध्यक्ष दिलीप सिद्धे, शहराध्यक्ष मनोज निकम, कार्याध्यक्ष माणिकराव बिराजदार, प्राहार संघटनेचे विजय माने, चंद्रकांत कुंभार, शिवराज स्वामी, दादा शेख, न्यासाचे उपाध्यक्ष अभय खोबरे, अप्पा हंचाटे, शहाजीबापू यादव यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.
    याचवेळी सोलापूरचे अप्पर जिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख सहपरिवार यांचा ‘श्रीं’ची प्रतिमा, कृपावस्त्र व श्रीफळ देऊन मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला. यांच्या समवेत शिवसेना तालुका प्रमुख संजय (अण्णा) देशमुख, डॉ.बसवराज बिराजदार हे उपस्थित होते. देशाचे नेते, शेतकर्‍यांचे जाणते राजे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा खा. शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त १३ ते २० डिसेंबर दरम्यान स्वाभिमान सप्ताह साजरा केला जात असून त्यानिमित्त अक्कलकोट येथे अक्कलकोट तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात आ.अनिल
    पाटील यांनी स्वतः रक्तदान करुन नागरिकांना रक्तदानासाठी आवाहन केले. नागरिकांनी रक्तदान करुन रुग्णांना नवसंजीवनी देण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन केले.
    यावेळी जळगाव जि.प.सदस्या जयश्री अनिल पाटील, अक्कलकोट राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष दिलीप सिद्धे, शहराध्यक्ष मनोज निकम, कार्याध्यक्ष माणिकराव बिराजदार, चंद्रकांत कुंभार, सामाजिक कार्यकर्ते शिवराज स्वामी, दादा शेख व शहाजीबापू यादव यांच्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat team
    • Website
    • X (Twitter)

    Related Posts

    Amalner : अमळनेर गावात विवाहितेचा विनयभंग

    January 14, 2026

    Amalner : अमळनेरमध्ये दुचाकीवर जाताना मांजाने गळा कापला

    January 14, 2026

    Amalner:दहिवद ग्रामपंचायतीच्या वृक्षलागवडीची शास्त्रज्ञांकडून पाहणी

    December 29, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.