मुंबई, वृत्तसंस्था । लक्षवेधी सचूनेच्या वेळी सदस्य गोपीचंद पडळकर वीज प्रश्नावर आपली भूमिका मांडत असताना सत्ताधारी बाजूच्या बाकांवरुन काही सदस्यांनी शेतकरी चोऱ्या करतात, अशा प्रकारचे संतापजनक वक्तव्य केले. शेतकरी चोर आहेत का, असा घणाघाती सवाल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी उपस्थित केला.
तसेच सत्ताधारी बाकावरील त्या संबंधित सदस्यांनी आपल्या अवमानकारक वक्तव्याबद्दल माफी मागावी, अशी मागणीही दरेकर यांनी केली.
विरोधी पक्ष नेते दरेकर या वेळी आक्रमक झाले. शेतकरी काय चोर आहे का? शेतकऱ्याला चोर समजता काय तुम्ही? स्वतः तुम्ही चोऱ्या करता आणि शेतकऱ्याला चोर म्हणता काय? असे सवाल दरेकर यांनी केले. यावेळी भाजपाच्या सदस्यांनी त्या वक्तव्याचा निषेध केला व घोषणाबाजी केली. त्यामुळे उपसभापती निलम गो-हे यांनी सभागृहाचे कामकाज पाच मिनिटासाठी तहकूब केले.
