शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या मनसे चे तहसीलदार यांना निवेदन

0
95
जळगाव : प्रतिनिधी 
 आज रोजी महाराष्ट्रतील शेतकऱ्यांना २ लाखाच्या वरील कर्जधारक व रेग्युलर कर्ज भरणा करणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्यात यावे यासाठी जामनेर तहसीलदार यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आज निवेदन दिले.
महाराष्ट्र सरकार द्वारे सन २०१९ -२०मध्ये  महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची जाहीर घोषणा करण्यात आली होती या योजनेत समस्त कर्जबाजारी शेतकरी यांना लाभ मिळणार असल्याच्या मोठं मोठ्या वल्गना या सरकार द्वारे करण्यात आल्यात यात प्रामुख्याने महात्मा फुले यांच्या नावाने घोषित केलेल्या शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ हा २ लाख रु च्या आतील कर्जधारक यांना कर्जमाफी घोषित करण्यात आली तसा शासनाने जि आर देखील काढला होता मात्र त्या सोबत २ लाखापेक्षा जास्तीचे कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना देखील २ लाखापर्यंत या योजनेचा लाभ होईल त्यासाठी शेतकऱ्यांनी २लाखावरील पैसे बँकेत जमा करण्याचे देखील घोषित करण्यात आले होते व जे शेतकरी रेग्युलर कर्ज भरतात त्यांना देखील सरकार ५० हजार मानधन देणार असल्याचे राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी जाहीर केले होते मात्र सरकारने फक्त घोषणाबाजी केल्याने समस्त महाराष्ट्रातील शेतकरी कर्जमाफी ची आशा लावून बसला व त्या आशेअभावी शेतकऱ्यांचे २वर्षाचा व्याजाचा बोझा वाढल्याने शेतकरी चिंताग्रस्त व वैफल्यग्रस्त झालेला आहे त्यात बँकांनी तगादा लावणे सुरू केले आहे सरकारच्या या अमिश्याला बळी पडल्यामुळे च शेतकरी कर्जबाजारी झाला आहे त्यामुळे सरकारने तात्काळ रेग्युलर कर्जभरणा करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार मानधन द्यावे व २लाखावरील कर्जबाजारी शेतकऱ्यांना देखील महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळावा
यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने निवेदन देण्यात आले यावेळी मनसे जिल्हा उपाध्यक्ष डॉ विजयानंद कुलकर्णी ,
मनसे चे तालुकाध्यक्ष अशोक पाटील , मनविसे तालुका उपाध्यक्ष किशोर पाटील , तालुका उपाध्यक्ष नाना शिंदे , किरण अहिरे , आशुतोष पाटील , सागर जोशी , दत्ता पाटील , मयूर कोळी , अश्विन कोकाटे ,आकाश मोरे , मुकेश बेलदार , सचिन जाधव , योगेश जोशी ,किशोर जोशी , देवानंद जोशी , वासुदेव पलोदे ,लक्ष्मण सनसे , राम भोसले , गौतम दाभाडे , रामेश्वर शिंदे ,विनोद चव्हाण , अरुण भोसले , जगदीश कुरकुरे आदी कार्यकर्ते उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here