Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»शेतकऱ्यांच्या सुविधेसाठी गोदाम उभारणीस सर्वतोपरी मदत : ना.गुलाबराव पाटील
    जळगाव

    शेतकऱ्यांच्या सुविधेसाठी गोदाम उभारणीस सर्वतोपरी मदत : ना.गुलाबराव पाटील

    saimat teamBy saimat teamJanuary 8, 2022No Comments3 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव, प्रतिनिधी । राज्य शासन हमी भावाने धान्य खरेदी करत असल्याने शेतकऱ्यांना वाजवी दर मिळून त्यांना लाभ होत आहे तर धान्य दीर्घ काळापर्यंत सुरक्षित टिकवण्यासाठी गोदाम आवश्‍यक असून म्हसावद येथे गोदामाच्या बांधकामासाठी आपण सर्वतोपरी मदत करणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले. ते तालुक्यातील म्हसावद येथे शेतकी संघातर्फे शासकीय भरडधान्य योजनेचा प्रारंभ करतांना बोलत होते.याप्रसंगी त्यांनी शेतकी संघाने धान्य खरेदीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना उत्तम भाव देतांनाच संस्थात्मक पातळीवर नफा मिळवल्याबद्दल कौतुक केले.

    तर यानंतर चिंचोली येथे कृषी औद्योगिक सेवा सहकारी संस्थेतर्फे शासकीय धान्य खरेदीचा प्रारंभ पालकमंत्र्यांनी केला. या दोन्ही ठिकाणी पालकमंत्र्यांच्या हस्ते काटा पूजन करून पहिल्यांदा माल आणलेल्या शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

    राज्य शासनाच्या भरडधान्य खरेदी योजनेस आज पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्याहस्ते म्हसावद आणि चिंचोली येथे प्रारंभ करण्यात आला. यात म्हसावद येथे तालुका शेतकी संघातर्फे धान्य खरेदी सुरू करण्यात आली. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार नामदेव पाटील, बाजार समिती सभापती कैलास चौधरी, जि.प. सदस्य पवन सोनवणे, शिवसेना तालुका प्रमुख राजेंद्र चव्हाण, शिवसेना उपजिल्हा संघटक नाना सोनवणे, शेतकी संघाचे चेअरमन अजबराव पाटील,संचालक विजय सोनवणे, समाधान चिंचोरे, सरपंच गोविंद पवार, रोहयो योजना तालुका अध्यक्ष रवींद्र कापडणे, किशोर चिंचोरे, अनिल भोळे, सचिन पाटील, नारायण चव्हाण, महेंद्र पाटील, मधुकर चव्हाण, हौसीलाल परदेशी, परिसरातील सरपंच शिरीष जाधव, डॉ. सुधाकर पाटील, निंबा ठाकरे, विष्णू आप्पा चिंचोरे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

    याप्रसंगी ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते काटा पूजन करण्यात आले तर शासकीय खरेदीसाठी सर्वप्रथम माल आणलेल्या बिलवाडी येथील भगवान पाटील या शेतकऱ्याचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. ना. गुलाबराव पाटील यांच्या पुढाकाराने म्हसावद येथे शासकीय धान्य खरेदी केंद्राला गेल्या वर्षी परवानगी मिळाली होती. या वर्षभरात केंद्रावर मका 4 हजार 66 क्विंटल, ज्वारी 4712 क्विंटल; गहू 14 आणि हरबरा 8 हजार 20 क्विंटल इतकी खरेदी करण्यात आली. खरीप आणि रब्बी हंगामातील या खरेदीमुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या कृषी मालास वाजवी भाव मिळाला. यासोबत शेतकी संघाला 5 लाख 62 हजार इतका नफा राहिला. यामुळे परिसरातील शेतकऱ्यांनी भाऊंचा हृद्य सत्कार केला. शेतकी संघाने गोडाऊन उभारणीचा प्रस्ताव तातडीने सादर करावा असे निर्देश ना.पाटील यांनी दिले तर म्हसावद येथील तब्बल 30 कोटी रूपयांची तरतूद असणाऱ्या पुलाचे काम लवकरच सुरू होणार असल्याची घोषणा केली तसेच म्हसावदकरांच्या पिण्याच्या पाण्याची समस्या कायमची दूर करण्यासाठी आधीची योजना समाप्त करून नवीन 5 योजना मार्गी लावणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

    या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दक्षता समिती सदस्य अर्जुन पाटील यांनी केले तर आभार शेतकी संघाचे मॅनेजर दीपक पाटील यांनी मानले.
    यानंतर चिंचोली येथे कृषी औद्योगिक सेवा सहकारी संस्थेतर्फे शासकीय धान्य खरेदीचा प्रारंभ पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार नामदेव पाटील, बाजार समिती सभापती कैलास चौधरी, जि.प. सदस्य पवन सोनवणे, तालुका प्रमुख राजेंद्र चव्हाण, कृषी औद्योगीक सेवा सहकारी संस्थेच्या चेअरमन शैलजाताई निकम, व्हाईस चेअरमन संजय पाटील, संचालक रामभाऊ पाटील, रोहित निकम, रमेशआप्पा पाटील, शांताराम सोनवणे, वसंत साबळे, वाल्मिक पाटील, नाना पाटील, जनाआप्पा कोळी, मॅनेजर विश्‍वनाथ पाटील आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat team
    • Website
    • X (Twitter)

    Related Posts

    Jalgaon : तरुण मजुराचा राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या

    February 14, 2026

    Jalgaon : कर्जबाजारी शेतकऱ्याची विषप्राशनातून आत्महत्या

    February 14, 2026

    Jalgaon : साई गजानन रेसिडेन्सीतील १८ दुचाकी जळून खाक माथेफिरूच्या कृत्याचा संशय

    February 14, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.