शेतकऱ्यांच्या मदतीने कोल्ह्याला मिळाले जीवदान

0
14

जामनेर, प्रतिनिधी । तालुक्यातील पहुर येथून जवळच असलेल्या शिवचरण सावळे यांच्या शेतामध्ये गटनंबर 597 एक कोल्हा जखमी अवस्थेमध्ये आढळला असता, त्यांनी भ्रमणध्वनीवरून वनपाल प्रशांत पाटील यांना माहिती दिली.

त्यांच्या माहितीवरून प्रशांत पाटील यांनी तातडीने वन कर्मचारी जीवन पाटील, आनंदा ठाकरे, ईश्वर पारधी, रमेश पाटील यांना तात्काळ शेतात जाण्यास सांगितले, त्यानंतर त्यांनी शेतकर्‍याला फोन करून शेताचे लोकेशन विचारून ते त्या ठिकाणी पोहोचले असता त्यांना कोल्हा हा जखमी अवस्थेमध्ये दिसला त्यावेळी त्यांनी त्वरित पशुवैद्यकीय अधिकारी राठोड पहूर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की सदर प्राण्याला पशुवैद्यकीय दवाखान्यात घेऊन या असे सांगितले वनकर्मचारी जीवन पाटील यांनी काही शेतकऱ्यांच्या साह्याने कोल्ह्याला उचलण्याचा प्रयत्न केला. मात्र कोल्हा हा मागील दोन पायांवर उभा राहू शकत नसल्यामुळे तो घाबरलेल्या अवस्थेमध्ये त्यांच्यावर ती दात दाखवायला लागला, नंतर जीवन पाटील यांनी वनपाल प्रशांत पाटील यांना भ्रमणध्वनी वरून पुन्हा माहिती दिली त्यानंतर प्रशांत पाटील यांनी वनखात्याची पिंजरा गाडी बोलवुन तातडीने त्याठिकाणी पाठवला असता सर्वांच्या मदतीने कोल्हाला पहूर येथील पशुवैद्यकीय दवाखाना मध्ये आणण्यात आले आणि प्रथम उपचार देऊन त्याला जामनेर येथे हलवण्यात आले, या निमित्ताने एका वन्य जीवाला जीवदान मिळाल्याची आढळून आले त्यामुळे परिसरामध्ये या घटनेमुळे आनंद व्यक्त होत आहे यावेळी शिवचरण सावळे सह शेतकरी बांधव उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here