बोदवड, प्रतिनिधी । शेतकरी दूध उत्पादक सहा.सोसायटी मर्या. बोदवडच्या चेअरमनपदी शांताराम कोळी व व्हाईस चेअरमनपदी धनराज पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
शेतकरी दूध उत्पादक सह. सोसा. मर्या. बोदवड संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक संस्थेच्या कार्यालयात बिनविरोध पार पडली त्यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी ई ए हावळे साहेब यांचे अध्यक्षतेखाली निवडणूक पार पडली. तसेच आज दि. २५ चेअरमन व व्हाईस चेअरमन यांचे निवड ही एकनाथ हावळे, लेखापरीक्षक सहकारी संस्था उडते पथक (पदम) जळगाव यांचे अध्यक्षतेखाली खेळीमेळीचे वातावरणात एकमताने निवळ करण्यात आली. त्यावेळी नवनिर्वाचित संचालक देवानंद भोई, भास्कर गुरचळ, विनोद काळे, रतन सूर्यवंशी, चिंधाबाई माळी, मंजुराबाई माळी, निलेश ठाकरे, युवराज ठोंबरे, विकास भोई, आकाश कंडेलकर यांचेसह गोपाळ पाटील, धनराज माळी, निरंजन चंदनकार, राजू सुर्यवंशी, कृष्ण कोळी आदी उपस्थित होते.