शेतकरी आंदोलनाला पाठिंब्यासाठी संयुक्त किसान मोर्चातर्फे उद्या निदर्शने

0
36

जळगाव ः प्रतिनिधी
शहरातील अजिंठा शासकीय विश्रामगृहात विविध सामाजिक संघटनांची बैठक झाली. या बैठकीत दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकर्‍यांच्या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संयुक्त किसान मोर्चातर्फे राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त तीव्र निदर्शने करण्याचा निर्णय घेण्यात आला तसेच जिजाऊ जन्मोत्सवापासून ते प्रजासत्ताक दिनापर्यंत साखळी पद्धतीने धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे अध्यक्ष मुकुंद सपकाळे यांनी दिली.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी लोकसंघर्ष मोर्चाच्या प्रतिभाताई शिंदे या होत्या. त्यांनी आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले.यावेळी लोकसंघर्ष मोर्चाचे सचिन धांडे, महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे मुकुंद सपकाळे, छावा मराठा युवा महासंघाचे अमोल कोल्हे, मुस्लिम मंच आणि मणियार बिरादरीचे फारुख शेख, नियाज अली फाउंडेशनचे अयाज अली, बहुजन क्रांती मोर्चार्चे सुनिल देहाडे, कादरीया फाऊंडेशनचे फारुख कादरी, संभाजी ब्रिगेडचे खुशाल चव्हाण, लोकशाही जनक्रांती पार्टीचे ईश्‍वर मोरे, प्रा.आशिष जाधव, डॉ. प्रकाश कांबळे,डॉ.प्रा.मिलींद बागुल,श्रीकांत मोरे, फईम पटेल, सत्यशोधक विद्यार्थी संघटनेचे विकास मोरे,छावा मराठा संघटनेचे प्रमोद पाटील,ईश्‍वर पाटील, गुलाम अहमद मिर्झा, सौरभ बोरसे, समीर शेख, जनक्रांती मोर्चाचे चंदन बिर्‍हाडे, रमेश सोनवणे, अविनाश तायडे, प्रा.पानपाटील आदी प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. आभार हरिचंद्र सोनवणे यांनी मानले. आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here