शून्य ऊर्जेवर आधारित शीत कक्षाची उभारणी

0
20

 

मामलदे(ता. चोपडा) – प्रतिनिधी

येथे के. व्ही. पटेल कृषी महाविद्यालय शहादा येथील कृषिदूत चेतन पाटील यांनी ग्रामीण जागरूकता आणि कृषी औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रम २०२१-२२ अंतर्गत गावात शून्य ऊर्जेवर आधारित शीत कक्षाची उभारणी करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
काढणीनंतर फळांमध्ये काही जैविक आणि रासायनिक क्रिया होत असतात. फळे कमी तापमान व योग्य आर्द्रतेमध्ये साठवल्यास या क्रियांचा वेग मंदावतो. त्यामुळे फळांचा साठवण कालावधी वाढण्यास मदत होते.
असे वातावरण तयार करण्यासाठी शीतगृहाची आवश्यकता भासते व त्याची उभारणी ही अत्यंत महागडी असून, ती सर्वसामान्य शेतकऱ्याला आर्थिकदृष्ट्या परवडणारी नसते. त्यांच्यासाठी शून्य ऊर्जेवर आधारित शीतकक्ष प्रत्यक्ष बनवून दाखविले.
याप्रसंगी शेतकरी सज्जनसिंग परदेशी , जीवन पाटील, दगडू पटेल ,रूपेश पाटील, मनोहर पाटील,लोटन पाटील, सतिष पाटील जयेश महाजन व आदि शेतकरी उपस्थित होते.
कृषिज्ञान दौरा पूर्ण करण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रकाश पटेल, कार्यक्रम समन्वयक प्रा. चंद्रशेखर पाटील, तसेच कार्यक्रम अधिकारी प्रा. मुकेश कोळी यांचे विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here