जळगाव । शिवाजीनगरमधील हुडको परिसरात 30 डिसेंबर रोजी रात्री 2 वाजता झालेल्या दगडफेकीतील जखमी शकील अली उस्मान अली (वय 30, रा.शिवाजीनगर, हुडको) याचा बुधवारी दुपारी 2 वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला. यासंदर्भात पोलिसांनी सहा जणांना ताब्यात घेतले.
हुडको परिसरात 30 डिसेंबर रोजी रात्री 2 वाजता किरकोळ कारणावरुन दगडफेक झाली होती. या वादाशी काहीही संबध नसलेला शकीलअली उस्मानअली हा युवक घराबाहेर आला असता त्याच्या डोक्याला दगड लागला. यात गंभीर जखमी झाल्याने त्यास खासगी रूग्णालयात दाखल केले. उपचारानंतर शकील घरी गेला होता. त्याची तब्बेत बुधवारी पुन्हा खालावली. त्यास जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल केले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.