जळगाव : प्रतिनिधी
येथील शिवाजीनगर उस्मानिया पार्क मधीसल एका तरुणाने राहत्या घरात गळफास घेतल्याची घटना काल रात्री घडली. त्यामुळे या परिसरात खळबळ उडाली असून अनेक तर्क-वितर्क व्यक्त केले जात आहे.
अनेक दिवसांपासून हाताला काम नसल्याने आरीफ खान रशीद खान (३३) हा तरुण तणावात होता, असे नातेवाईकांनी सांगितले. दरम्यान, काल दुपारी पती-पत्नींमध्ये वाद झाला होता.हे प्रकरण पोलिस स्टेशनपर्यंत गेले होते.यानंतर त्याने रात्री गळफास घेतला. आरोपी आरीफ खान यास रात्री दहा वाजता जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकार्यांनी तपासणी करून त्यास मयत घोषित केले.
मयत आरीफ खान यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले व आई,वडील असा परिवार असून खासगी वाहनांवर तो चालक म्हणून कार्यरत होता.या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे असून पुढील तपास सुरु आहे.