शिवसेनेतर्फे आयोजित शिबिरामध्ये १५ दात्यांचे रक्तदान

0
12

जळगाव ः प्रतिनिधी
रक्ताची उणीव भरुन काढण्यासाठी शिवसेना शाखा बळीराम पेठ व माधवराव गोळवलकर स्वयंसेवी रक्तपेढी जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिरामध्ये १५ दात्यांनी रक्तदान केले.विपीन पवार यांचा सक्रिय सहभाग व गोळवलकर रक्तपेढीचे जनसंपर्क अधिकारी अर्जुन राठोड, तंत्रज्ञ मधुकर सैदाणे,रामचंद्र पोतदार यांनी रक्तसंकलन केले. शहरातील तरुणांनी रक्तदान किवा रक्तदान शिबिराचे आयोजन करून सामाजिक बांधिलकी जपण्याचे आवाहन रक्तदान चळवळीतील कार्यकर्ते नीलेश पाटील यांनी या निमित्ताने केले आहे.
शिवसेना, आझाद मंडळातर्फे ३० बाटल्या रक्तदान
जळगाव ः शिवसेना बळीरामपेठ शाखा, गोळवलकर रक्तपेढी आणि आझाद क्रीडा सांस्कृतीक मित्र मंडळातर्फे रविवारी रक्तदान शिबिरात ३० बाटल्या रक्त संकलन करण्यात आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रक्तदान करण्याचे आवाहन केले आहे. याला प्रतिसाद देत शिवसेना बळीरामपेठ शाखा, आझाद मित्र मंडळातर्फे रविवारी सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत रक्तदान शिबिर घेण्यात आले. गोळवलकर रक्तपेढीतर्फे रक्तसंकलन करण्यात आले. शिवसेना विभागप्रमुख विपीन पवार, सामाजीक कार्यकर्ते जितेंद्र बागरे, शिवसेना उपविभागप्रमुख जितेंद्र गवळी, निर्भय पाटील, अक्षय पिंगळे, गजानन परदेशी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here